भारत - बांग्लादेश सदभावना सायकल यात्रेचे वरोऱ्यात भव्य स्वागत
राजेंद्र मर्दाने-चंद्रपूर
भारतीय स्वांतत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष आणि बांग्लादेश मुक्ति संग्रामचा सुवर्णमहोत्सवाचे औचित्य साधून भंगलेली मने व देश जोडण्यासाठी स्नेहालय संस्थेने २ ऑक्टोबर ते १६ डिसेंबर या कालावधीत " भारत - बांग्लादेश सदभावना सायकल यात्रेचे " आयोजन केले आहे. २ ऑक्टोंबर २१ रोजी अहमदनगर पासून या यात्रेचा प्रारंभ झाला. अहमदनगर ते नौखाली ७५ दिवस,३ हजार किलोमीटर यात्रेचा १६ डिसेंबर २०२१ रोजी नौखालीत समारोप होईल. तत्पूर्वी आज सदभावना यात्रा वरोऱ्यात दाखल होताच आनंदवन मित्र मंडळा,वरोरा व ओशनिक बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने या सदभावना सायकल यात्रेचे स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी आनंदवन मित्र मंडळाचे सचिव तथा ओशनिक बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र मर्दाने, मार्गदर्शक डॉ. वाय. एस. जाधव, आनंदवन मित्र मंडळाचे अध्यक्ष डॉ. प्रवीण मुधोळकर, पदाधिकारी प्रवीण गंधारे, संधी निकेतन (आनंदवन) अधीक्षक रवींद्र नलगिंटवार, इकराम पटेल, शौकत खान, साबिया खान, उमेश गुलाक्षे ,अविनाश कुळसंगे आदींची उपस्थिती होती.