कर्जत केंद्राची शिक्षण परिषद संपन्न
ज्ञानेश्वर बागडे-कर्जत
कन्या शाळेच्या सविता आष्टेकर यांनी एनएएस व एनइपी याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले ,दहिगाव शाळेचे शिक्षक नितीन जाधव टॅग यावर मार्गदर्शन केले. एनएस प्रश्नपत्रिका बाबत इंजिवली शाळेचे शिक्षक दिनेश लाड यांनी सखोल माहिती दिली तर केंद्रप्रमुख मोहन पाटील यांनी एन ए एस आणि स्वाध्याय उपक्रम करावेत याविषयी मार्गदर्शन केले. नंतर विविध विषयांचा आढावा घेतला. मुरली गावित यांनी आभार प्रकट केले.राजेंद्र धोत्रे,अर्चना धर्मसाले,संतोष दातीर, हिराचंद म्हात्रे,नितीन थळे, विशाल पोटे,अजय खंडागळे पंजाबसिंग वसावे आदी शिक्षकांनी ही शिक्षण परिषद यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली.