मराठा समाजाच्या मागण्यांकडे सरकारचे दुर्लक्ष-खासदार छत्रप संभाजीराजे!
ज्ञानेश्वर बागडे-कर्जत
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराजांचा विचार घेऊन आपण निघालो असून शाहू महाराजांनी देशातील बहुजनांना पहिले आरक्षण दिलं त्यात अठरापगड जाती जमाती अनुसूचित जाती जमाती तसेच मराठा समाजाचा समावेश होता ,मराठा समाजाचे दोन टप्पे राज्य सरकारने करावेत ,सरकारकडे पाच सहा मूलभूत प्रश्न मांडले असून त्याकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचे वक्तव्य खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी कर्जत येथे जनसंवाद यात्रे दरम्यान मुद्रे नाना मास्तर नगर येथे संभाजी महाराज यांच्या स्मारकामधील दर्शन घेऊन उपस्थित सकल मराठा समाजाला मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
खालापूर येथील जनसंवाद यात्रा उरकून खासदार संभाजी राजे कर्जत येथे आला असता प्रथम त्यांचे ढोल ताशा,सनई चौघड्याने शाही स्वागत करण्यात आले.फुलांची पुष्पवृष्टी करण्यात आली.यावेळी जनसंवाद यात्रेत कर्जत मधील सकल मराठा समाजाचे अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून दर्शन घेतले.नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांनी खासदार संभाजीराजे यांचे शाल श्रीफळ पुष्पहार देऊन स्वागत केलं.
त्यांनतर त्यांनी कडाव कशेळे येथे जाताना त्यांनी आमदार महेंद्र थोरवे यांच्या घरी सदिच्छा भेट दिली आणि त्यांनंतर त्यांनी पुढच्या यात्रेला सुरुवात केली.आज कर्जतला सकल मराठा समाज जनसंवाद यात्रेत विविध पक्षाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.