माथेरानच्या रेल्वे स्थानकाचा कायापालट आणि मिनिट्रेनची सुरळीत सेवा देणार : शलभ गोयल
चंद्रकांत सुतार-माथेरान
दिवाळी हंगाम लवकरच सुरू होणार असून सध्यातरी नेरळ ते माथेरान दरम्यान धावणारी मिनिट्रेन सेवा बंदच आहे.निदान अमन लॉज ते माथेरान या तीन किलोमीटर अंतरासाठी शटल सेवा सुरू आहे त्यामुळे पर्यटकांना सोयीस्कर होत आहे अन्यथा माथेरानचे आगामी सर्वच हंगाम व्यर्थ गेले असते.
माथेरान मिनिट्रेनला युनेस्को मध्ये स्थान मिळाल्यानंतर माथेरान नगरपालिका व रेल्वे प्रशासन यांच्या संयुक्त आयोजनातून माथेरान मध्ये लवकरच १३ व १४ तारखेस माथेरान मध्ये भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे ह्यातून पर्यटकांना माथेरानचे पर्यावरण , संस्कृतीचे दर्शन घडविण्याचा मानस आहे ह्याकरिता आज रेल्वेचे व्यवस्थापक (डी.आर.एम.)शलभ गोयल यांनी माथेरानला भेट दिली.यावेळी गोयल यांनी माथेरान रेल्वे स्टेशनच्या संपूर्ण भागाची पाहणी करून संबंधित अधिकारी कर्मचारी वर्गाला स्टेशन परिसरात पर्यटकांना कशाप्रकारे अद्ययावत सोयीसुविधा दिल्या जातील याबाबत सूचना केल्या.
रेल्वे महाव्यवस्थापक मुंबई शलभ गोयल,गौरव झा,शलभ गोयल मंडल रेल प्रबंधक मुंबई,गौरव झा वरिष्ठ मंडल वाणिज्य प्रबंधक,माथेरान पालिकेकडून नगराध्यक्षा प्रेरणा सावंत,माजी नगराध्यक्ष अजय सावंत,विवेक चौधरी,मनोज खेडकर, राजेश दळवी, तसेच माथेरानच्या मुख्याधिकारी सुरेखा भणगे शिंदे,सामाजिक कार्यकर्ते सुनील शिंदे ,आरपीआयचे अध्यक्ष अनिल गायकवाड आदी उपस्थित होते.