दुबई येथून मदकार्य करणाऱ्या मौलाना तौसिफ कोंडेकर यांचा रिलीफ फाउंडेशनच्या वतीने विशेष सन्मान
ओंकार रेळेकर-चिपळूण
आपण ज्या जन्मभूमीत वाढलो त्या मातीची जाण सर्वानाच असते आणि ही मंडळी संकट काळात आपल्या कोकणवासीयांच्या मदतीला सतत पुढे असतात असेच एक उदाहरण म्हणजे नोकरी व्यवसाय निमित्त आखाती देश दुबई येथे असलेल्या तौसिफ कोंडेकर यांनी आपल्या गावावर आलेल्या प्रत्तेक संकट काळात मदतीचा हात पुढे केला आहे,कोरोना संक्रमणकाळ आणि २२ जुलै रोजी आलेल्या महापुरात
स्वतः उपस्थित राहून तसेच नंतरच्या काळात दुबई येथून संकटाची परिपूर्ण माहिती घेऊन कोंडेकर चिपळूण,खेड,महाड वासीयांच्या मदतीला धावून आले होते.गोरगरीब आणि गरजवंतांना शिक्षणात मदतकार्य असो किंवा वैद्यकीय मदत या कामात त्यांचा नेहमी मदतीचा हात असतो.महापूरातही कोंडेकर यांचे उल्लेखनीय काम होते.महापुरात आणि कोरोना संक्रमण काळात नागरिकांना मदतकार्य करणाऱ्या संस्था ,सामजिक कार्यकर्ते यांचा रविवारी रिलीफ फाउंडेशन यांच्या वतीने माजी मंत्री,रायगडचे खासदार सुनील तटकरे,महाडचे आमदार भरतशेठ गोगावले ,रिलीफचे सर्वेसर्वा माजी सभापती सिकंदर जसनाईक,हनिफ घनसार यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला या सन्मान सोहळ्यात दुबई येथील सामाजिक कार्यकर्ते मौलाना तौसिफ अब्दुल हमीद कोंडेकर यांचा खास कतार देशातून आणलेल्या सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला.कोंडेकर कामानिमित्त दुबई असल्यामुळे त्यांच्या वतीने फहद वाडेकर यांनी सत्कार स्वीकारला.