Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

मिशन 'कवच कुंडल' साठी तहसीलदार विक्रम देशमुख यांची प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेट

 मिशन 'कवच कुंडल' साठी तहसीलदार विक्रम देशमुख यांची प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेट

तळागाळातील लोकांपर्यंत पोहचा आणि लसीकरण पूर्ण करा : तहसीलदार विक्रम देशमुख

               नरेश कोळंबे कर्जत

कर्जत तालुक्यात लसीकरणाची मोहीम यशस्वी पणें राबविली जात आहे. ह्याच लसीकरण मोहिमेला आणखी वेग देण्यासाठी कर्जत तालुका तहसीलदार विक्रम देशमुख यांनी प्रत्येक केंद्र आणि उपकेंद्रात जाऊन माहिती घ्यायला सुरुवात केली आहे. आज शुक्रवारी कडाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात भेट देत ' कवच कुंडल' बद्दल माहिती दिली. 

      महाराष्ट्रात लसीकरण वेगाने होणे गरजेचे असल्याने दि. ७ रोजी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सर्व अधिकाऱ्यांशी ऑनलाईन पध्दतीने चर्चा करत त्यांना दिवसाला १५ लाख लोकांचे लसीकरण करण्याचे आवाहन सोपवले आहे. महाराष्ट्रातील १२ करोड जनतेपैकी ९ करोड लोकांचे लसीकरण झाले असल्याने उरलेल्या लोकांना घरोघरी जाऊन माहिती देऊन लसीकरण मोहीम पूर्ण करा असे त्यांनी बोलताना सांगितले. ह्यासाठी राज्याकडे संपूर्ण साधन सामुग्री उपलब्ध असून कशाचीही कमी पडून देणार नाही, असे यावेळी टोपे यांनी सांगितले होते आणि ८ ऑक्टोबर ते १४ ऑक्टोबर दरम्यान दिवसाला १५ लाख लोकांना लस देणे ह्या मोहिमेला 'कवच कुंडल' मोहीम असे नाव देण्यात आले आहे. सोबतच कोरोना ने मरण पावलेल्या लोकांच्या घरातील लोकांना शासनातर्फे ५०००० रुपये मिळतील असे जाहीर केले आहे. 

ह्याच धर्तीवर शुक्रवारी कर्जतचे तहसीलदार विक्रम देशमुख यांनी कर्जतमधील कशेळे आणि विविध ठिकाणी भेट दिल्या. त्यामध्ये कडाव प्राथमिक आरोग्य केंद्रात सुध्दा त्यांनी भेट देत लसीकरणची संपूर्ण माहिती घेतली, सोबतच सर्व अधिकारी वर्ग तसेच ग्रामपंचायत मधील उपस्थित सर्व लोकांना त्यांनी कवच कुंडल मोहीमबद्दल माहिती दिली असून ही मोहीम राबविण्यासाठी तळागाळातील लोकांपर्यंत पोहचा आणि त्यांना लसीकरण करून घेण्यासाठी प्रवृत्त करा, असे आवाहन तहसीलदार विक्रम देशमुख यांनी यावेळी सर्वांना केले .

    यावेळी नायब तहसीलदार सुधाकर राठोड, कडाव सजाचे तलाठी आशिष राऊत ,मंडळ अधिकारी भगवान बुरुड , कडाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकारी अरुणा भांबेरे , तसेच रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष अशोक भोपतराव ,कडाव ग्रामपंचायत सरपंच अशोक पवार, कडाव माजी उपसरपंच हर्षद भोपतराव, नसरापूर ग्रामपंचायत सदस्य संपत हडप, भगवान बोराडे, हरेश मराडे , महेश काळोखे , आरोग्य अधिकारी विकास कटारे, आरोग्यसेविका आणि आशा वर्कर्स आदी उपस्थित होते.

कशेळेतही मार्गदर्शन

        दिनेश हरपुडे-कर्जत


मिशन कवच कुंडले अंतर्गत जास्तीत जास्त लोकांनी कोविड19 च्या लसीकरणचा लाभ प्राप्त करून घ्यावा याकरीता तहसीलदार विक्रम देशमुख यांनी कशेळे ग्रामपंचायतीचे सरपंच,व जिल्हा परिषद सदस्य  रेखाताई दिसले , यांनी ग्रामीण रुग्णालय कशेळे येथे भेट घेऊन शिस्तबद्ध time bound पद्धतीने vaccination ड्राईव्ह घेणेकरिता मार्गदर्शन केले व सदर ड्राईव्ह अंतर्गत 100% नागरिकांचे लसीकरण करून घ्यावे याबद्दल अडचणी जाणून घेतल्या... त्यानुसार सर्वानी लसीकरणाचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies