मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय: कार्याध्यक्षपदी शीतल करदेकर तर प्रमुख कार्यवाहपदी रविंद्र गावडे
महाराष्ट्र मिरर टीम-मुंबई
शतकोत्तर सुवर्ण महोत्सवाकडे वाटचाल करणा-या , महाराष्ट्राचा मानबिंदू व समृद्ध वारसा असणाऱ्या "मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या"कार्याध्यक्षपदी सौ शीतल करदेकर यांची तर , कार्यवाहपदी सौ उमा नाबर व सौ शिल्पा पितळे यांची निवड करण्यात आली.
संस्थेच्या 125 वर्षाचे काळात महत्वाचे पदाचा मान कर्तृत्ववान महिलांना देण्यात आला! कार्योपाध्यक्षपदी श्री मारूती नांदविस्कर, प्रमुख कार्यवाहपदी श्री रविंद्र गावडे, कोषाध्यक्ष श्री प्रदीप ओगले, श्री जयवंत गोलतकर, सचिव-सौ उमा नाबर, श्री उदय सावंत , सौ शिल्पा पितळे यांची निवड करण्यात आली.
नुकत्याच झालेल्या निवडणूकीत 34 साधारण सभा सदस्यांमधून श्री.जयवंत गोलतकर,श्री.सुरेंद्र करंबे,श्री.उदय सावंत,श्री.रवींद्र गावडे ,श्री.सुनील राणे,श्री.विनायक परब ,श्री. प्रदीप ओगले,श्री. हेमंत जोशी,श्री ,मनीष मेस्त्री,सौ.शीतल करदेकर,श्री.मारुती नांदविस्कर ,सौ. उमा नाबर ,श्री.सूर्यकांत गायकवाड,सौ.शिल्पा पितळे,श्री.स्वप्निल लाखवडे हे 15 सदस्य बिनविरोध कार्यकारिणीवर निवडून आले होते. शुक्रवार दि 29 रोजी उपाध्यक्ष डॉ भालचंद्र मुणगेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आठ पदाधिकाऱ्यांची निवड खेळीमेळीच्या वातावरणात सर्वसहमतीने करण्यात आली.
या बैठकीस कार्यकारिणी सदस्यांसह उपाध्यक्ष सौ विद्या चव्हाण, श्री प्रभाकर नारकर,प्रदीप कर्णिक, विश्वस्त श्री प्रताप आसबे , श्री अरविंद तांबोळी, मावळते प्रमुख कार्यवाह श्री सुभाष नाईक उपस्थित होते