दक्षिण रायगड जिल्हा संभाजी ब्रिगेडने दिलं तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्र्याना निवेदन
संतोष सुतार-माणगाव
या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, राज्यातील विविध जिल्ह्यांमधून वेगवेगळ्या स्वरूपात मुली व महिलांवरील होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. परिणामी राज्यात महिला सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रस्थापित केलेल्या स्वराज्य मध्ये परस्त्रीला बहिणीसमान पाहिले जात असे. त्याच पार्श्वभूमीवर महिलांवरील अत्याचाराविरोधात अनेक कायदे, प्रबोधन होऊनही अत्याचार कमी होत नसल्याचे वास्तव चित्र सध्या पाहायला मिळत आहे. त्यात बलात्कारासारखी घटना स्त्रीचे संपूर्ण आयुष्य उध्वस्त करते. अशावेळी संबंधित आरोपीला तात्काळ फासावर चढवण्याचे दायित्व सरकारने दाखवावे, जेणेकरून असा विचार मनात आणणाऱ्या हीन प्रवृत्तीच्या व्यक्तीच्या मनात कायमस्वरूपी जरब बसू शकेल. नुकतीच घडलेली साकीनाका येथील बलात्काराची घटना असो किंवा ठाणे येथील सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर केलेला हल्ला असो अशा आरोपींमध्ये जरब बसावी यासाठी आरोपीला फाशीची शिक्षा मिळाली पाहिजे. तसेच गुन्हेगारांवर तत्काळ कार्यवाही करून एकंदरीत महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी व महिला सक्षमीकरणाच्या हेतूने नवीन विधेयक आणण्यासाठी राज्य शासन त्वरित दोन दिवसांचे विशेष अधिवेशन घेऊन गांभीर्यपूर्वक सदर खटला फास्ट ट्रॅक वर चालून संबंधित आरोपी रोहित कठोर शासन किंबहूना फाशीची शिक्षा केली जावी असे निवेदनात म्हटले आहे.
निवेदन देताना शिवश्री वैभव सुर्वे यांच्या सोबत रेवती कदम आणि महिलावर्ग तसेच कार्यकर्ते मयूर तांदळेकर, शुभम तांदळेकर,अभिषेक येरुणकर, हर्षल भिंगारे, यश जामसुदकर, सुरज मंडल आदि उपस्थित होते.
यावेळी श्रीमती रेवती कदम यांना "महिला संघटक रायगड जिल्हा(दक्षिण)" हे पद वैभव सुर्वे यांच्या प्रमुख उपस्थिती देण्यात आले. रेवती कदम यांच्या बरोबर इतर मान्यवर महिलावर्गाकडून जिल्हाध्यक्ष वैभव सुर्वे यांना मायेची राखी बांधून सन्मान करण्यात आला.