सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील रस्ते खड्डे मुक्त कधी होणार?
तोहीद मुल्ला-सांगली
- सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रात वाली कोण?
- महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना सुस्थितीत रस्ते कधी मिळणार?
- सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील रस्ते खड्डे मुक्त कधी होणार?
गेली 8 दिवसांपासून राष्ट्र विकास सेनेच्या माध्यमातून सांगली जिल्हा ग्रामीण व महानगरपालिका क्षेत्र हद्दीतील रस्ते खड्डे मुक्त झाले पाहिजेत या मागणीसाठी मोहीम चालू करण्यात आली आहे.
सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका अंतर्गत मृत्यूचा सापळा बनलेल्या रस्त्यावरच्या खड्यांचे तात्काळ दुरुस्ती करून रस्ते सुस्थितीत व रस्ते खड्डे मुक्त झाले पाहिजेत या मागणीसाठी राष्ट्र विकास सेनेच्या वतीने प्रशासन ,लोकप्रतिनिधी यांचे लक्ष वेधण्यासाठी प्रदेशाध्यक्ष अमोस मोरे व युवक प्रदेश अध्यक्ष प्रशांतभाऊ सदामते यांच्या नेतृत्वाखाली सांगली महानगरपालिका समोर लक्षवेधी निदर्शने करण्यात आली,
यावेळी महापालिका विरोधात जोरदारपणे घोषणाबाजी करण्यात आली,नागरीक घरपट्टी,पाणीपट्टी व इतर कर 100 टक्के भरत असतात मग नागरिकांना ही त्यांच्या सोयीसाठी रस्ते सुस्थितीत असायला हवेत,हजारो कोटींचा निधी रस्ते दुरुस्ती साठी असतो तो कुठे जातो असाही प्रश्न उपस्थित झाला आहे,रस्त्यावर छोटे मोठे अनेक अपघात दररोज होत असतात, त्यांना व कुटुंबातील व्यक्तींना महानगरपालिका भरपाई देणार का,रस्त्यावर खड्डे जे तयार झालेत हे नागरिकांच्या जीवशी खेळत असल्याने महानगरपालिका आयुक्त यांच्यावर सदोष मनुष्य वधाचे गुन्हे दाखल झाले पाहिजेत अशी युवा नेते प्रशांतभाऊ सदामते यांनी केली,यावेळी मनपा अधिकारी यांना निवेदन देण्यात आले,येत्या सोमवार पासून सांगली मिरज कुपवाड हद्दीतील रस्ते खड्डे मुक्त करण्यात येतील असे महानगरपालिका अधिकारी यांनी आश्वासन दिले या महिन्यात नागरिकांना सुस्थितीत रस्ते मिळतील असेही सांगण्यात आले,यावेळी आंदोलनात ऐश्वर्या कोळी पश्चिम महाराष्ट्र युवती अध्यक्ष, सारिका जमदाडे महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष, महेश चेंडके रिक्षा वाहतूक सेना जिल्हा अध्यक्ष, मा अतुल बामणे सांगली शहर कार्याध्यक्ष, सॅमसन मोरे युवा नेते,रोहिणी पळशीकर महिला आघाडी उपाध्यक्ष, मा संदीप देवकते उपाध्यक्ष,मा फर्याद सय्यद उपाध्यक्ष रिक्षा वाहतूक सेना,कु ज्योती सरगर सा मि कु मनपा क्षेत्र युवती अध्यक्ष, गोपाळ वाघमारे अलोक लोंढे आदी राष्ट्र विकास सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते