चेतना सिन्हा यांना२०२१ सातारा भूषण पुरस्कार जाहीर
मिलिंदा पवार -खटाव
मराठवाडा विद्यापीठ नामांतर चळवळ शेतकरी संघटनेची चळवळ यातून त्यांचा परिचय विजय गुरव यांच्याशी झाला त्यांची सहधर्मचारिणी म्हणून चेतना सिन्हा म्हसवडला आल्या. म्हसवड मधील महिलांना संघटीत करून तेथील महिलांना सक्षम करण्यासाठी अनेक अडचणींवर मात करून त्यांनी 1997 ला 'माणदेशी महिला बँक' स्थापन केली डोअर स्टेप बँकिंग ,डेली बँकिंग मेंढी खरेदीसाठी कर्ज अशा नवनवीन संकल्पना राबवत ही बँक ग्रामीण महिलांची आधार बनले आहे. मा ण देशी फाउंडेशन, माणदेशी चेंबर ऑफ कॉमर्स ,व्यसनमुक्ती उद्योगिनी प्रशिक्षण ,असे नवनवीन उपक्रम राबवत यांनी हजारो माणदेशी महिलांना सक्षम केले आहे. तसेच कम्युनिटी रेडिओ असेही नवनवीन उपक्रम यशस्वी केले आहेत त्यांच्या या कामाची दखल राष्ट्रीय व जागतिक पातळीवर घेतली गेली आहे 2018 मधील दावोस येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये त्या एका सभेच्या अध्यक्षा होत्या. तसाच बहुमान त्यांनी अर्जेंटिना मधील डब्ल्यू ट्वेंटी संमेलनातही प्राप्त केला होता भारत सरकारच्या नारीशक्ती सन्मान या सर्वोत्तम स्त्री सन्मानाने त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते गौरविण्यात आले आहे.
सातारा येथील रा.ना. गोडबोले सार्वजनिक ट्रस्ट व सातारकर नागरिकांतर्फे दिला जाणारा मानाचा सातारा भूषण पुरस्कार 2021 गेले अनेक वर्ष स्त्री सबलीकरणासाठी तळमळीने काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्ता आणि माणदेशी महिला सहकारी बँक व मान देशी फाउंडेशन च्या संस्थापिका डॉक्टर चेतना सिन्हा यांना जाहीर केला आहे.
1991 पासून अर्थ कला विज्ञान साहित्य अध्यात्म सामाजिक कार्य अशा कोणत्याही क्षेत्रात उत्तुंग कार्य करणार्या सातारा जिल्ह्याच्या सुपुत्र त्या क्षेत्रात राहून कार्य करणाऱ्या व्यक्ती सातारा भूषण पुरस्काराने गौरविले जाते यापूर्वी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, प्राध्यापक शिवाजीराव भोसले, ह भ प बाबा महाराज सातारकर , नीलकंठ राव कल्याणी,शाहीर साबळे डॉक्टर रणजीत जगताप डॉक्टर नरेंद्र दाभोळकर धावपटू ललिता बाबर गिरीश कुबेर ह.भ.प. चारुदत्त बुवा आफळे आदी मान्यवरांना या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे सन्मानचिन्ह व तीस हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप असून दिवाळीनंतर तो समारंभपूर्वक प्रदान करण्यात येईल अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष साहित्य अरुण गोडबोले यांनी दिली