अलिबागेत शिवसेना-शेकापत चांगलीच जुंपली!
आरोप-प्रतिरोपाच्या फैरी,जिल्हा परिषद निवडणूक जवळ आल्याने आरोप -प्रत्यारोप
अमूलकुमार जैन-अलिबाग
अलिबाग तालुक्यातील कुर्डुस जिल्हा परिषद मतदारसंघात आमदार महेंद्र दळवी यांच्यामाध्यमातून मोठ्या प्रमाणात विकासकामे पाहून कुर्डुस जिल्हा परिषद मतदार संघ हा हातून निसटून जातो की काय?या भीतीने शेकाप झाले वैफल्यग्रस्त झाले असल्याची टीका अलिबाग तालुका प्रमुख राजा केणी यांनी आमदार महेंद्र दळवी यांच्या अलिबाग तालुक्यातील राजमळा या निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत केली.
यावेळी रायगड जिल्हा परिषदेच्या शिवसेना गटनेत्यां मानसी दळवी,कुसूंबळे उपसरपंच जीवन पाटील,उत्तम पाटील यांच्यासाहित शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते.
महाविकास आघाडीच्या माध्यमातून कुर्डुस जिल्हा परिषद मतदार संघाचा गेल्या चाळीस वर्षात जेवढा विकास झाला नाही तेवढा विकास दोन वर्षात आमदार महेंद्र दळवी यांनी केला आहे.तसेच येत्या 31 ऑक्टोबर2021 रोजी कुसूंबळे आणि सभागृहाचे उदघाटन सोहळा मोठ्या दिमाखात पार पडणार आहेत.यासाठी महाविकास आघाडीचे नेते खासदार सुनील तटकरे,पालकमंत्री अदिती तटकरे,अलिबाग मुरुडचे आमदार महेंद्र दळवी,काँग्रेस प्रदेशचे सचिव प्रवीण ठाकूर उपस्थित राहणार आहेत .याची माहिती मिळाल्यापासून शेकाप नेते वैफल्यग्रस्त झाल्यासारखे बडबडत आहेत.काही दिवसांपूर्वी सेना कार्यकर्ते यांची आढावा बैठक ही पार पडली होती.या बैठकीत शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांच्या विरोधात चर्चा झाली वावड्या उठविण्यास शेतकरी कामगार पक्षाने सुरवात केली आहे.विधानसभा २०१९ मधील निवडणुकीत अलिबाग-मुरुडच्या जनतेने नेतृत्त्व नाकारल्यामुळे झालेला दारूण पराभव जिव्हारी लागल्यामुळे आणि आगामी काळातील जिल्हा परिषद निवडणुकीतील होणारा पराभव समोर दिसत असल्यामुळे अलिबाग येथील शेकापक्षातील काही महाभाग मंडळींनी आता शिवसेनेचे आमदार आणि त्यातील प्रामाणिक, निष्ठावान कार्यकर्त्यांची नाहक बदनामी तसेच अपप्रचार करायला सुरुवात केली आहे. शेकापक्षाच्या या मुखपत्रातून अलिबाग-मुरुड तालुक्याचे शिवसेनेचे विद्यमान आमदार तथा जिल्हाप्रमुख महेंद्र दळवी तसेच तालुकाप्रमुख राजा केणी यांची जनतेमध्ये असलेली स्वच्छ प्रतिमा जाणीवपूर्वक मलिन करण्याचा घाट शेकापक्षाच्या काही मुजोर लोकांनी घातला असून अलिबाग-मुरुडकरांच्या मनात शेकापक्षाबद्दल प्रचंड रोष निर्माण झाला आहे.आमदार महेंद्र दळवी यांच्या कार्यप्रणाली वर खुश होऊन शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते हे शिवसेनेत प्रवेश करीत आहे.स्थानिक स्तरावर नवीन जुने कार्यकर्ते यांच्या थोडेफार वाद होत असतात.ते होणारे वाद स्थानिक स्तरावर मिटविलेसुद्धा जातात.शेतकरी कामगार पक्षाचे नेते आघाडीमध्ये बिघाडी कशी होईल यासाठी ते सतत प्रयत्न शील असतात.असेही राजा केणी यांनी सांगितले.ज्याप्रमाणे शेकापने रोहा रामराज रस्त्यावर आंदोलन केले.त्याप्रमाणे त्यांनी मुरूड साळाव रस्त्यावर हिंमत असेल तर आंदोलन करावे असे आव्हान राजा केणी यांनी केले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्या मानसी दळवी यांनी सांगितले की,समुद्रातून माश्याला जेव्हा बाहेर काढले जाते तेव्हा तो तडफडतो, तशी अवस्था आता शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्यांची झाली आहे. त्यांच्या कडे सत्ता असताना त्यांनी जनतेचा विकास न करता फक्त स्वतःचा विकास केला आहे.जेएसडब्ल्यू कंपनीच्या सीएसआर फंड हा सामाजिक कामासाठी असतो आंबेपुर सरपंच यांनी त्या फंडाचा दुरुपयोग केला आहे.शेतकरी कामगार पक्षाची महिला आघाडीच्या नेत्या चित्रलेखा पाटील सांगतात की,आमदार महेंद्र दळवी हे भूमाफिया आहेत .आमदार महेंद्र दळवी हे भूमाफिया असेल तर त्यांनी सिद्ध करावे.तसेच महेंद्र दळवी यांच्यावर महिलेच्या छेडछाड बाबत एकतरी गुन्हा असेल तर सिद्ध करून द्यावा असे आवाहनही मानसी दळवी यांनी केला आहे.