आता टीईटी परीक्षा 21 नोव्हेंबर 2021ला
मिलिंदा पवार -सातारा
10 ऑक्टोबर 2021 ऐवजी 31 ऑक्टोबर 2021 रोजी ची परीक्षा घेण्यात येणार होती .10 ऑक्टोबर रोजी TET(Teachers eligibility test) व UPSC परीक्षा एकाच दिवशी होती. त्यामुळे विद्यार्थी संभ्रमात होते व ही अडचण बघून परीक्षा परिषदेने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर पुन्हा आरोग्य परीक्षेच्या घोळ याचा फटका बसला 31 ऑक्टोबर रोजी आरोग्य विभागाची परीक्षा असलामुळे 31 ऑक्टोंबर ची परीक्षा 30 ऑक्टोंबर मध्ये बदल करण्यात आला होता.
राज्यात डीएड आणि बीएड पात्रताधारक भावी शिक्षकांसाठी टीईटी एक्झाम पहिल्यांदा 10 ऑक्टोबर 2019 रोजी त्यानंतर 30 ऑक्टोबर रोजी घेण्यात येणार होती आता पुन्हा 31 ऑक्टोबर रोजी घेण्यात येणार होती व आता ते तिसऱ्यांदा परीक्षेच्या तारखेत बदल होऊन 21 नोव्हेंबर 2021 रोजी टीईटी परीक्षा घेण्यात येणार आहे .
एक तर राज्यात शिक्षक भरती गेले कित्येक दिवस होत नाही . शिक्षक भरती परीक्षेसाठी शिक्षक परिषद व सरकारही गंभीर नाही अशी तक्रार विद्यार्थ्यांकडून होत आहे व आणखीन किती सहनशीलता शिक्षकांची पाहणार असा प्रश्न विद्यार्थ्यांच्या तुन विचारला जात आहे.