चित्रा पाटील यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नामुळे चिखली आणि पोयनाड प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन रुग्णवाहिका
अमूलकुमार जैन-अलिबाग
रायगड जिल्हा परिषदेच्या कुर्डुस मतदार संघात पोयनाड आणि चिखली हे दोन प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. चिखली हे केंद्र येथे रुग्णवाहिका असून तिची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे चिखली प्राथमिक आरोग्य केंद्र हे पेझारी नागोठणे रस्त्यावर आहे चिखली हा भाग ग्रामीण आणि डोंगराळ असल्यामुळे तेथील रुग्णांना वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध होत नसे त्यामुळे बहुतांश वेळा येथील रुग्णांना उपचार मिळण्यास उशीर होतो. तसेच पोयनाड प्राथमिक आरोग्य केंद्र हे अलिबाग वडखळ या रस्त्यावर आहे.पोयनाड येथे सुद्धा रुग्णांची संख्या ही मोठ्या प्रमाणात आहे.यामध्ये बहुतांश रुग्ण हे अपघातामधील असतात. त्यांनासुद्धा वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध होणे गरजेचे आहे. मात्र येथील सुध्दा रुग्णवाहिका ही नादुरुस्त असल्यामुळे तिचा वापर कमी प्रमाणात होत होता.
रायगड जिल्हा परिषदेच्या कुर्डुस मतदारसंघाच्या सदस्या चित्रा पाटील यांनी कोव्हिडं 19 या विषाणूंच्या महामारीत मोठ्या प्रमाणात रुग्णाची संख्या वाढली होती.कुर्डुस जिल्हा परिषद मतदार संघात असणाऱ्या पोयनाड आणि चिखली या दोन प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन रुग्णवाहिका उपलब्ध होण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे यांच्याकडे सातत्याने मागणी करीत पाठपुरावा केले.कुर्डुस मतदार संघात बहुतांश आदिवासी वाड्या असून त्या डोंगराळ भागात वसलेल्या आहेत. त्यामुळे या आरोग्य केंद्रासाठी रुग्णवाहिका उपलब्ध होणे ही प्रामुख्याने या भागातील नागरिकांची मागणी होती.त्या मागणीची दखल घेत जिल्हा परिषद सदस्या चित्रा पाटील यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करीत होत्या.त्यामागणी ची दखल घेत चिखली पप्राथमिक आरोग्य केंद्रासाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली.सदर रुग्णवाहिकेचे लोकार्पण सोहळा आज पार पडला.चिखली प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णवाहिका आल्याने या परिसरातील नागरिकांनी चित्रा पाटील यांचे आभार मानले आहेत.
त्याचप्रमाणे पोयनाड प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यासाठी विधानपरिषद आमदार तथा शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांच्याआमदार निधीमधून सतरा लाख रुपये किंमतीची अद्यावत रुग्णवाहिका खरेदी करून ती रुग्णवाहिका ही पोयनाड प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी उपलब्ध करून दिली आहे.त्याचे लोकार्पण सोहळा हा आमदार जयंत पाटील,रायगड जिल्हा परिषदेच्या अर्थ व बांधकाम सभापती नीलिमा पाटील,आस्वाद पाटील,चित्रा पाटील,जिल्हा परिषद सदस्य डी. बी.पाटील यांच्या उपस्थित पार पडले.कुर्डुस जिल्हा परिषद मतदार संघातील पोयनाड आणि कुर्डुस या दोन प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्याबद्दल मतदारसंघाच्या वतीने चित्रा पाटील यांनी आमदार जयंत पाटील आणि शासनाचे आभार मानले.