मिशन कवच कुंडल अभियान अंतर्गत नगरपरिषद क्षेत्रात लसीकरण
99 लाभार्थीनीं घेतला लाभ
संजय गायकवाड-कर्जत
येथील श्री कपालेश्वर मंदिरात नगरपरिषद आणि उपजिल्हा रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी विशेष लसीकरण मोहीम शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास नगराध्यक्षा सुवर्णा जोशी, नगरसेविका स्वामिनी मांजरे, नगरसेवक विवेक दांडेकर, मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील, नगरपरिषद प्रशासकीय अधिकारी उमेश राऊत, आरोग्य विभागाचे सुदाम म्हसे यांनी भेट दिली.
उपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ. जयश्री म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली धनश्री मोरे यांनी लसीकरण केले, यावेळी 99 लाभार्थीनीं लस घेतली. आज पासून रोज श्री कपालेश्वर मंदिरात सकाळी 10 ते 5 या वेळात रोज पुरुष आणि महिला या दोन्हीसाठी लसीकरण सुरु राहील. कर्जत शहरात ज्या नागरिकांनी एकही डोस घेतला नाही त्यांनी लगेच श्री कपालेश्वर येथील किंवा अन्य कुठल्याही शिबिरात मध्ये लस घ्यावी असे आवाहन कर्जत नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील यांनी केले आहे.