नवदुर्गा माता महिला मंडळ वडूज
मिलिंदा पवार -वडूज खटाव
नवदुर्गा माता महिला मंडळ वडूज हे मंडळ गेली पाच ते सहा वर्ष झालं दुर्गा मातेची स्थापना करत आहे हे मंडळ म्हणजे महिलांनी महिलांसाठी उभारलेलं व्यासपीठच म्हटलं तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही इथे अगदी देवी आणण्यापासून ,रोजची देवीची सकाळ संध्याकाळची आरती, तसेच विविध कार्यक्रम म्हणजे दांडिया महाप्रसाद व नऊ दिवसांमध्ये राबविण्यात येणारे विविध कार्यक्रम हे सर्व येथील महिलाच पाहतात
हे महत्त्वाचे प्रत्येक एक दिवशी या देवीचे रूप असेल त्या देवीच्या आवडीच्या रंगानुसार देवीला ती साडी अर्पण करणे, नेसवणे व त्यानुसारच सर्व महिलाही तोच रंग परिधान कर तात हे विशेष . येथील सर्व लहान मोठी गोष्टी महिला समर्थपणे पार पाडतात त्यामुळे अध्यक्ष खजिनदार हया देखील महिलाच आहेत यामध्ये साधारणत चाळीस ते पन्नास महिला असल्यामुळे सर्व महिला प्रत्येक कामामध्ये अगदी उस्फूर्तपणे सहभाग घेतात व देवीचे का कार्य आनंदाने पार पाडण्यासाठी प्रत्येकीचा फार मोठा हातभार लागतो पहिल्या वर्षी काढलेली मिरवणूक तर खुपच संस्मरणीय होती.
यावर्षी कोरोना असल्यामुळे निर्बंध असल्यामुळे दांडिया चे नियोजन न करता भजन कीर्तन इत्यादी कार्यक्रम निर्बंधा सह पार पडले
तसेच आज नवव्या दिवशी संध्याकाळच्या कँडल आरतीला वडूज पंचक्रोशीच्या PSI सौ .पालकर मॅडमनी कुंटूंबासह 'नव दुर्गा माता महिला मंडळ 'वडूज येथे नियोजीत केलेल्या आरती चा सर्व लहान मुले तसेच मोठ्यांनीही त्या लाभ घेतला तसेच पालकर मॅडमच्या उपस्थिती ने सर्व स्रियांना आनंद लाभला व त्याबददल सर्व महिलांनी, मंडळाने त्यांचे आभार मानले व मानाची ओटी भरली.