मिरजेत मद्यधुंद तरुणाने एकाच्या डोक्यात लोखंडी रॉड घालून केला खून
दोन तासात पोलिसांनी आरोपीला केले जेरबंद
तोहीद मुल्ला -सांगली
समाधान हॉटेल मालगाव रोड येथे रात्रीच्या सुमार ही घटना घडली आहे गोट्या उर्फ पृथ्वीराज प्रतापसिंह भंडारे वय 24 राहणार मालगाव सावंत वस्ती असे खून झालेल्या तरुणांचे नाव आहे समाधान हॉटेल मालगाव रोड येथे गोट्या भंडारे याच्याशी झालेल्या किरकोळ वादातून बाबासाहेब कोडलकर वय 26 राहणार लक्ष्मी नगर याने डोक्यात लोखंडी रॉड घालून खून केला या घटनेनंतर घटनास्थळावरून आरोपी बाबासाहेब कोडलकर हा पळून गेला होता याची माहिती ग्रामीण पोलीस निरीक्षक बेंदरे व त्याच्या पथकाला मिळाल्यानंतर अवघ्या दोन तासात आरोपीला पोलिसांनी शोधून जेरबंद केलं आहे या खुनाचे नेमके कारण समजू शकले नाही ,दोघे दारूच्या नशेत होते वाद झाला त्यामध्ये हा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे आरोपी बाबासाहेब कोडलकर याला पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे उपविभागीयपोलीस अधीक्षक अशोक वीरकर अधिक तपास करत आहेत.