छताचा पत्रा तोडून दुकानातील रोकड लांबवली!
आरोपीला म्हसळा पोलिसांनी केली अटक
अरुण जंगम-म्हसळा
म्हसळा पोलिसात दाखल झालेल्या गुन्ह्याप्रमाणे आरोपी आंकेश पाडावे याने दुकानातील रोख रक्कम 4560 रुपये चोरून नेले.पोलिसांना मिळालेल्या खबरी नुसार आरोपी पाडावे याला नवी मुंबईतुन ताब्यात घेतलं.
वरिष्ठ पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक सूर्यकांत जाधव,संतोष चव्हाण, प्रकाश हंबीर,राजेंद्र खाडे आदी पोलीस पथकाने गुन्ह्याच्या तपासकामी यशस्वी कामगिरी केली.