..... माणसातील माणुस जीवंत असेल तर नक्कीच माणुसकी जपली जाते!
मोलमजुरी करणाऱ्या या तरुणाचे साताऱ्यात कोणीच नातेवाईक न्हवते तर छत्तीसगड येथून येणाऱ्या नातेवाईकांकडे तर साताऱ्यात येण्या इतकेही पैसे नसल्याचे समोर आले.या सर्व घटना स्टँड येथे बंदोबस्तास असलेल्या पोलीस दादांमध्ये सुरू होत्या त्यांना ही या तरुणाचे अंत्यसंस्कार कसे करायचे हा मोठा प्रश्न पडला होता. या सर्व प्रकारची माहिती माझे मित्र पत्रकार प्रशांत जगताप याला समजली त्याने आम्हांसर्व पत्रकारांना व सामाजिक कार्यकर्त्यांना संपर्क साधला माझे मित्र पत्रकार निखिल मोरे मी व सामाजिक कार्यकर्ते प्रशांत नलवडे आम्ही तात्काळ सातारा सिव्हीलला पोहोचलो आणि सातारा पोलीस यांच्या मदतीने आम्ही या तरुणांची बॉडी सातारा सिव्हिल हॉस्पिटल येथून ती सातारा कैलास स्मशान भूमी येथे घेऊन जाऊन त्या तरुणावर विधिवत अंत्यसंस्कार केले
या कार्यासाठी मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिष पाटणे,सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र चोरगे व अनेक दानशूर व्यक्तींनी मोलाची मदत करून अमच्यावरील मोठा भार हलका केला
आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी मोल मजुरी करत फिरनारा हा तरुण काम शोधण्यासाठी छत्तीसगड येथून गोव्याला गेला होता आणि तेथून तीन दिवसांपूर्वी तो साताऱ्यात आला होता मात्र साताऱ्यातील बोचऱ्या थंडीने त्याला गाठले आणि सातारा स्टँडवर तीन दिवसांपूर्वी थंडीच्या गरठ्याने या तरुणाचा मृत्यू झाला. सातारा पोलिसांनी मृत्यू नंतर त्याचे नातेवाईक शोधून काढले पण त्याची व त्याच्या कुटुंबियांची हालाकीची परिस्थितीची जाणीव सातारा पोलिसांना झाली आणि त्यांनी पत्रकार मित्रांना याची माहिती दिली.मग पत्रकार आणि पोलीस बांधवानी हातात हात घालून या परस्थिला सामोरे जाण्याचे ठरले आणि अवघ्या तासाभरात सर्व काही मदतीचे साहित्य गोळा झाले आणि आम्ही सर्वांनी मिळून या तरुणावर विधिवत अंत्यसंस्कार करून त्याच्या नातेवाईकांना थोडीशी आपल्या सर्वांच्या सहकार्याने आर्थिक मदत देऊ शकलो . आपल्या सर्वांच्या सहकार्याने हे मोठे कार्य घोडले याला आम्ही फक्त निमित्त मात्र..
आजवर अनेक बेवारस नागरिकांवर मी अंत्यसंस्कार केले आहेत मुळातच हे सामाजिक बांधिलकीचे गुण संस्काराने मिळतात हे खरे आहे. कारण माझे वडील गेली अनेक वर्षे झाली आजही बेवारस नागरिकांवर अंत्यसंस्कार करत आहेत म्हणून आज त्यांच्या संस्कारवर त्यांचा वारसा पुढे चालवत आहे
..... माणसातील माणुस जिवंत असेल तर नक्कीच माणुसकी जपली जाते हेच या घटनेतून दिसून आले