कोल्हापूर जिल्ह्यात ७ वर्षीय मुलाचा नरबळी..? महाराष्ट्र हादरला
जय कराडे-कोल्हापूर
अपहरण केलेल्या ७ वर्षीय आरव केशव केशरे याचे २ दिवसांपूर्वी अपहरण झाले होते.घरातील लोकांनी गांवभर आरवचा शोध घेतला परंतु तो कुठेही निदर्शनास आला नाही.त्यानंतर त्याच्या घरातील लोकांनी पोलिस स्टेशन मध्ये आरव हारवल्याची तक्रार दाखल केली.गेल्या २ दिवसांपासून सर्वजण त्याचा शोध घेत होते.आज पहाटे ६ वाजता आरवचा मृतदेह घरामागे सापडला असून त्याच्या मृतदेहावर हळद, कुंकू,गुलाल टाकला असून त्याचा नरबळी दिला असल्याची शंका नातेवाइकांसह वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना आहे.त्या दृष्टीने पोलिसांनी तपासाला गती दिली आहे.निष्पाप आरवचे कोणी आणि कशासाठी अपहरण करून त्याचा खून केला हा पोलिसां समोर तपासाचा मुळ मुद्दा आहे.
दिड महिन्यांपूर्वी जिल्ह्यातील कागल तालुक्यातील सोनाळी गांवच्या वरद पाटील या बालकांच्या हत्येचे मुळ कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.हि घटना ताजी असतानाच जिल्ह्यातील आणखी एका बालकाची हत्या झाल्याने कोल्हापूर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे.
वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली आहे.पोलिसांनी मारेकऱ्यांचा तातडीने छडा लावून त्यांना बेड्या ठोकाव्यात ही मागणी जनतेतून जोर धरू लागली आहे.