पाण्यावरून कोणी राजकारण करेल त्याला पाणी पाजेन- मंत्री गुलाबराव पाटील
अमोल चांदोरकर - श्रीवर्धन
याचं कार्यक्रमाप्रसंगी पन्हळघर बुद्रुकच्या विद्यमान सरपंच अपेक्षा जाधव यांनी पाणीपुरवठा मंन्त्री गुलाबराव पाटील साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादीतून शिवसेनेत जाहिर प्रवेश केला. छोटेखानी कार्यक्रमाच्या देखील गुलाबराव पाटील साहेब यांनी वेळ दिल्याप्रसंगी गुलाबराव पाटील साहेब यांचे आभार मानत भविष्यात देखील शिवसेना मंत्र्यांच्या माध्यमातून दक्षिण रायगडमध्ये विकास करू व जिल्ह्यात विकासकामांवरून राजकारण केले जाते, परंतु शिवसेना प्रत्येक प्रश्नाला सडेतोड उत्तर देईल व भविष्यात रायगड जिल्ह्यात पाच आमदार शिवसेनेचे निवडून येणार असल्याचा विश्वास शिवसेना उपनेते विनोदजी घोसाळकर साहेब यांनी व्यक्त केले. शिवसेनेच्या माणगाव तालुक्यांतील १५७ नळपाणी पुरवठा योजना शिवसेनेच्या माध्यमातून करणार आहोत. या कार्यक्रमाप्रसंगी येथील जिल्ह्यातील पुढारी यांनी आडकाठी केली परंतु शिवसेनेच्या वाघाला कोणीही अडवू शतक नसल्याचा टोला हाणत आगामी जिल्हा परिषद निवडणूकीत शिवसेना एक नंबरवर आणणार असल्याचे आमदार भरतशेट गोगावले साहेब यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवसेना माजी जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर साहेब यांनी केले. यावेळी जिल्हाप्रमुख अनिल नवगणे, जिल्हा परिषद विरोधी पक्षनेते सुरेन्द्र म्हात्रे, नवी मुंबई उपजिल्हाप्रमुख संतोष घोसाळकर , अरूणजी चाळके, तालुका प्रमुख गजानन अधिकारी,जिल्हापरिषद सदस्या अमृता हरवंडकर, पंचायत समिती उपसभापती शिंदे, पंचायत समिती सदस्य महेन्द्र तेटगुरे, रवी टेंबे, संजय पवार यांच्यासह माणगाव तालुका शिवसेना पदाधिकारी, लोकप्रतिनिंधी, मांगरूळ ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, मांगरूळ ग्रामस्थ उपस्थित होते.