आमदार महेंद्र थोरवे यांच्या विशेष प्रयत्नातून व सहकार्याने आशा वर्कर, आरोग्य सेविका यांना २ हजार रुपयांचे मानधन वाटप....
महाराष्ट्र मिरर टीम-कर्जत
मागील दोन वर्षांपासून देशावर व महाराष्ट्रावर कोरोनाचे महाभयंकर संकट आहे.अशा परिस्थितीत प्रामाणिकपणे लोकहिताचे व सामाजिक सेवेचे काम आमदार महेंद्र थोरवे हे सातत्याने करत आहेत .
याच दृष्टीकोनातून आशा वर्कर व आरोग्य सेविका "माझे कुटुंब माझी जबाबदारी" या मोहिमेत काम करत असून स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अनेक कुटुंबियांची सेवा करत आहेत. आशा वर्करांचा सन्मान करणे गरजेचे असून त्याना सन्मान पूर्वक रु २ हजाराचे मानधन आज आमदार महेंद्र थोरवे यांच्या निवास स्थानी देण्यात आले. सद्याच्या आरोग्य सेवेतील आशा वर्कर व आरोग्य सेविका हे महत्वाचे घटक आहेत. परंतु सद्य परिस्थितीत शासनाकडून मिळणारे मानधन हे त्यांच्या सेवेनुसार अत्यंत तुटपुंजे आहे
या कारणास्तव शासनाकडून मिळणाऱ्या मानधनासोबत लोकप्रतिनिधी या नात्याने मदत केली पाहिजे या उदात्त हेतूने आज शिवतीर्थ या ठिकाणी जवळपास २०३ आशा वर्कर व आरोग्य सेविकांना मानधनाचे वाटप करण्यात आले. व आत्ता पर्यंत केलेल्या सेवेकरिता आशा वर्कर व आरोग्य सेविका यांचे आभार मान्यण्यात आले .येणाऱ्या दिवाळीच्या निमित्ताने हार्दीक शुभेच्छा त्यांनी यावेळी दिल्या.