किल्ले अजिंक्यतारा पायथा परिसरातील महत्वाचा प्रश्न लागणार मार्गी
आ. शिवेंद्रसिंहराजेंचे अजितदादांना निवेदन ; रु .३२.४४ कोटी निधीची मागणी
प्रतीक मिसाळ-सातारा
याबाबत आ . शिवेंद्रसिंहराजे यांनी वाई , महाबळेश्वर दौऱ्यावर आलेल्या ना . पवार यांची भेट घेऊन निवेदन दिले . सातारा हे ऐतिहासिक शहर असून सातारा नगरपरिषदेची स्थापना सन १८५३ मध्ये झालेली आहे . सातारा ही ' अ ' वर्ग नगरपरिषद आहे . सातारा शहर अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्यालगत वसलेले आहे . अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्यालगत डोंगरी भागात दोन किलोमीटर लांबीपर्यंत मोठ्या प्रमाणात वसाहत झालेली आहे . अजिंक्यतारा किल्ला हा कमकुवत मातीचा भुभाग आहे . सातारा येथे पावसाचे प्रमाणही जास्त असते त्यामुळे जास्तीच्या पावसात किल्ल्याचा भुभागाचे भूस्खलन होऊन अथवा दरड कोसळून या परिसरातील नागरिकांच्या जिवितास हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही . त्यामुळे नागरिकांच्या संरक्षणासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे . जुलै २०२१ मध्ये सातारा येथे झालेल्या अतिवृष्टीसंदर्भात आपण सातारा येथील बैठकीत सुचना देऊन अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्यालगत झालेल्या वसाहतीच्या संरक्षणासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करुन शासनास सादर करणेबाबत निर्देश दिले होते . त्याअनुषंगाने अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्यावर वसलेल्या वसाहतीच्या व नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना करणेसाठी सातारा नगरपरिषदेने तज्ञामार्फत सर्विस्तर प्रकल्प अहवाल तयार केला आहे . यामध्ये रिटेनिंग वॉल बांधकाम , किल्ल्यावरील पावसाचे पाणी वाहुन जाणेसाठी रिटेनिंग वॉललगत गटर व लगतच्या ओढ्याचे बळकटीकरण अशा बाबींचा समावेश केलेला आहे . या कामासाठी रु ३२.४४ कोटी खर्च अपेक्षित आहे . सविस्तर प्रकल्प अहवाल प्रधान सचिव ( २ ) , नगरविकास विभाग , मंत्रालय , मुंबई यांना सादर करणेत आला आहे . सदर कामासाठी शासनामार्फत आपत्कालिन बाब म्हणून विशेष अनुदान उपलब्ध करून देणे आवश्यक आहे . नागरी M वसाहत आणि नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या कामासाठी तातडीने ३२.४४ कोटी अनुदान उपलब्ध करून द्यावे , अशी मागणी आ . शिवेंद्रसिंहराजे यांनी ना . पवार यांच्याकडे केली . याबाबत तातडीने निर्णय घेऊ , असे आश्वासन ना . पवार यांनी दिल्याने सातारा शहराच्यादृष्टीने महत्वाचा असणारा प्रश्न मार्गी लागण्याचा मार्ग मोकळा झाला आहे .