शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त कर्जतमध्ये ठिकठिकाणी रक्तदान शिबिर!!!
ज्ञानेश्वर बागडे-कर्जत
आजच्या रक्तदान शिबिरात आमदार महेंद्र थोरवे यांनी ठिकठिकाणी भेट देऊन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहून रक्तदान शिबिरांचा आढावा घेतला. बाळासाहेब यांच्या शिकवणीप्रमाणे शिवसेना व शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते सातत्याने ८० टक्के व २० टक्के राजकारण करताना दिसतात.
याच आधारावर बाळासाहेबांच्या स्मृतिदिनानिमित्त तसेच आमदार महेंद्र थोरवे यांच्या मार्गदर्शनाखाली आज कडाव, नेरळ, कशेळे, डिकसळ,वेणगाव येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते याची संपूर्ण तयारी जिल्हा विभागातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केली होती. या रक्तदान शिबिरात अनेक लोकांनी सहभाग नोंदवून 404 लोकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केलं...