शिवशाहीर श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन
मिलिंद लोहार
ब्युरो पश्चिम महाराष्ट्र
उभ्या महाराष्ट्राला आपल्या साहित्यानं वेड लावणाऱ्या शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच पुणे येथील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात न्युमोनियावर उपचार सुरू असताना निधन झालं.
.
गेल्या काही दिवसांपासून बाबासाहेब यांची प्रकृती खालावली होती. त्यांच्यावर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू होते.
.
बाबासाहेबांना गेल्या आठवडाभरापासून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आलं .त्यांना न्युमोनियाची लागण झाली होती. रात्री त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे रुग्णालयाच्या वतीने सांगण्यात आले होतं अखेर त्यांची प्राण ज्योत मावळली.महाराष्ट्र एका साहित्यिक आणि इतिहासकाराला मुकला आहे.
.