दिवेआगर येथील सुवर्ण गणेश प्रतिष्ठापना कार्यक्रमाला शिवसेनेला डावलले ,शिवसैनिकांमध्ये नाराजी!
तटकरे कुटुंबीयांचा कार्यक्रम असल्याची टीका!
अमोल चांदोरकर - श्रीवर्धन
श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर तेथे २३ नोव्हेंबर रोजी सुवर्ण गणेश प्रतिष्ठापनेच्या कार्यक्रमाला शिवसेनेकडून नाराजी व्यक्त होत आहे.काही वर्षांपूर्वी दिवेआगर येथील सुवर्ण गणेशाची मूर्ती अज्ञात चोरट्यांनी पळवली होती त्यांनतर शासनाकडून नविन स्वरूपात मूर्ती घडवली गेली व तिची प्रतिष्ठापना करण्याचा कार्यक्रम येत्या २३ नोव्हेंबरला योजिला आहे मात्र आघाडीचा धर्म न पाळल्याने या कार्यक्रमाला शिवसेनेकडून नाराजी चा सुर उमटत आहे.
गणेश मूर्तीची चोरी झाल्या नंतर राज्याचे मुख्यमंत्री तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिवेआगर येथील गणेश मूर्तीच्या चोरीत घटनेत मृत पावलेल्या कुटुंबांची भेट घेऊन आर्थिक मदत देखील केली होती मात्र तरीही शिवसैनिकांना या कार्यक्रमाला का डावलेले जाते असा सवाल शिवसैनिकं उपस्थित करीत आहेत.