कोडोलीतील रस्त्याकडेला असलेल्या अतिक्रमणांवर हातोडा फिरणार....
रिबन डेव्हलपमेंट कायद्याअंतर्गत शासकीय हद्दीत अतिक्रमण केल्याबद्दल फौजदारी गुन्हा दाखल होणार
विशेष प्रतिनिधी -सातारा
कोडोली भागातील रस्ता हा महत्त्वाचा रस्ता मानला जातो कारण या रस्त्यातून पुढे जात असताना सातारा एमायडिसी लागते मात्र गेले कित्येक वर्ष रखडलेल्या या रस्त्याला चांगले स्वरूप दिसायला लागले आहे काम प्रगतिपथावर आहे मात्र काही ठिकाणी रस्ता मोठा केला जात नाही कारण नागरिकांनी केलेले अतिक्रमण हे अतिक्रमण आता काढले जाणार आहे आणि काही प्रमाणात काढले गेले आहे
उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग जावळी मेढा यांच्या कार्यालयातर्फे एक परिपत्रक देण्यात आले आहे त्यामध्ये नमूद केले आहे की हायब्रीड एन यु टी पियन 36 अंतर्गत महाबळेश्वर सातारा धामणेर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 140 या रस्त्याच्या कोडोली गावातून जाणाऱ्या लांबीतील अतिक्रमणे काढण्याबाबत
परिपत्रकात म्हटल्याप्रमाणे सर्व नागरिकांना कळविण्यात येते की महाबळेश्वर सातारा धामणेर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 140 या रस्त्याच्या कोडोली गावातून जाणाऱ्या लांबीत विषय आकित रस्त्याचे रुंदीकरण काम प्रगतीत असून रस्त्याच्या मध्यापासून 13 मीटर अंतरापर्यंत रुंदीकरण करण्यात येणार आहे आपण रस्त्याच्या मध्यापासून 13 मीटर अंतरामध्ये अनधिकृत बांधकाम केले आहे सदरचे अनधिकृत बांधकाम आपण स्वखर्चाने त्वरित काढून घ्यावे अन्यथा सदरचे अनधिकृत बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत काढून टाकण्यात येईल व अतिक्रमण काढण्यासाठी होणारा खर्च आपणाकडून वसूल करण्यात येईल व रिबन डेव्हलपमेंट कायद्याअंतर्गत शासकीय हद्दीत अतिक्रमण केल्याबद्दल फौजदारी गुन्हा दाखल होणार