काँग्रेसचा हात घरोघरी पोहचणार : प्रशांत यादव
सभासद नोंदणी मोहिमेस चिपळुणात जोरदार शुभारंभ
ओंकार रेळेकर-चिपळूण
शहरातील मुरादपूर येथील मिठागरी मोहल्ला येथे सोमवारी नगरसेवक करामत मिठागरी यांच्या प्रभागात काँग्रेस पक्षाची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी काँग्रेस पक्षाच्या सभासद नोंदणीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी मोहल्ल्यातील ज्येष्ठ नागरिक श्री. कादीर आदम मुन्शी यांचा सभासद अर्ज भरून सभासद नोंदणी मोहिमेला सुरुवात करण्यात आली. यावेळी तालुकाध्यक्ष मा. प्रशांत यादव, चिपळूणचे उपनगराध्यक्ष सुधीर शिंदे, नगरसेवक करामत मिठागरी, नगरसेवक कबीर काद्री, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते इब्राहिम दलवाई, माजी उपनगराध्यक्ष व काँग्रेसचे शहराध्यक्ष लियाकत शाह, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस सुरेश कातकर, काँग्रेसचे तालुका सचिव शमून घारे, महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष निर्मलाताई जाधव, शहराध्यक्ष श्रद्धा कदम, सेवादलच्या जिल्हाध्यक्ष नीलम शिंदे, सेवादलचे तालुकाध्यक्ष इम्तियाज कडू, सेवादलच्या युवती जिल्हाध्यक्ष भक्ती कुडाळकर, अल्पसंख्याक सेलचे तालुकाध्यक्ष अन्वर जबले, शहराध्यक्ष अल्ताफ दलवी, युवक काँग्रेसचे विधानसभा क्षेत्राध्यक्ष महेश कदम, असलम मिठागरी, जिल्हा कार्यकारिणीचे सदस्य गुलजार कुरवले आदी उपस्थित होते.