Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

पिंग पॉंग' कॉमेडीचा 'किंग काँग'

 'पिंग पॉंग' कॉमेडीचा 'किंग काँग'

-'पिंग पॉंग' या ओटीटी प्लॅटफॉर्म वर प्रेक्षकांना विनामूल्य घेता येणार धम्माल कॉमेडीचा आनंद

सुपरस्टार मकरंद अनासपुरे यांच्या उपस्थितीत झाला शो चा लॉचिंग सोहळा

                प्रियांका ढम-पुणे

अल्पावधीत लोकप्रिय झालेला 'पिंग पॉंग' हा ओटीटी प्लॅटफॉर्म मराठी प्रेक्षकांसाठी एक धमाल कॉमेडी शो घेऊन येत आहे.  दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर हा खळखळून हवसणारा शो प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या शो चे नाव'पिंग पॉंग' 'कॉमेडीचा किंग काँग' असे आहे. या शो चा लॉचिंग सोहळा मराठीतील सुपरस्टार अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या उपस्थित मोठ्या उत्साहात संपन्न झाला. 'पिंग पॉंग'  या ओटीटी प्लॅटफॉर्मचे प्रमुख पुण्यातील युवा उद्योजक जीवन बबन जाधव आहेत, 'कॉमेडीचा किंग काँग' या कॉमेडी शो ची निर्मिती सुद्धा त्यांनीच केली आहे. 

             'पिंग पॉंग' 'कॉमेडीचा किंग काँग' या कॉमेडी शो बद्दल माहिती देताना शो चे दिग्दर्शक चेतन चावडा म्हणाले,  'पिंग पॉंग' या फ्री ओटीटी प्लॅटफॉर्मवर आता 'कॉमेडीचा किंग काँग' हा धमाल कॉमेडी शो येत आहे.  राज्यभरातील उदयोन्मुख, टॅलेंटेड कलाकार संधी देण्याच्या उद्देशाने ' कॉमेडीचा किंग काँग' हा कॉमेडी शो सुरू करण्याची संकल्पना निर्माते, 'पिंग पॉंग' ओटीटी प्लॅटफॉर्म चे प्रमुख जीवन जाधव यांनी मांडली,  आहोत,  त्यानुसार 'कॉमेडी चा किंग काँग' शो मध्ये राज्याच्या विविध भागातील, शहरातील नवोदित, उदयोन्मुख, टॅलेंटेड कलाकार दिसणार आहेत. यामध्ये सिद्धेश्वर झाडबुके, विनोद खेडकर, दीप्ती सोनावणे, आशु वाडेकर, चेतन चावडा, सागर पवार, आदर्श गायकवाड, बाळासाहेब निकाळजे, यश पालनकर, संजय निकम, हेमा ताई, गौरी कुलकर्णी, योगेश सुपेकर, चैताली माजगावकर आदी १६ कलाकार आहेत. प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याबरोबरच त्यांना खळखळून हसण्यासाठीचे हे एक फूल्ल कॉमेडी पॅकेज आहे. यामध्ये कॉमेडी स्कीट, स्टँडअप कॉमेडी आदी असणार आहे. प्रेक्षकांना फक्त 'पिंग पॉंग' हे अॅप डाऊनलोड करून विनामूल्य 'कॉमेडीचा किंग काँग'या कॉमेडी शोचा आनंद  घेता येईल.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies