लालपरी च्या संपामुळे प्रायव्हेट गाड्यांचा धुमाकूळ मुंबई सातारा एक हजार रुपये प्रवासी भाडे!
मिलिंदा पवार -खटाव
या गर्दीचा फायदा घेण्याची सुरुवात खाजगी वाहन चालकांनी केली आहे. खासगी वाहन चालकांनी मुंबई पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांची आर्थिक लूट करण्यास सुरुवात केली आहे .एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू झाला आहे या संपाचा गैरफायदा मात्र खासगी वाहनचालक घेताहेत प्रवाशांना लुटण्याचा धंदा त्यांनी सुरु केला आहे सातारा-मुंबई 1000 तर सातारा हून पुण्याला जाण्यासाठी चारशे रुपये आकारत आहेत.
प्रवाशांना बाहेरगावी जाण्यासाठी खासगी वाहना शिवाय दुसरा पर्याय नसल्याने वाहन चालक सांगतील तेवढे पैसे देणे भाग पडत आहे सातारा-मुंबई प्रवासासाठी एसटीला ५४०₹ रुपये तिकीट दर असतानाही खासगी वाहने 1000 तिकीट घेत आहेत तसेच सातारा- पुणे मार्गासाठी 150 रुपये तिकीट असताना 300 ते 400 रुपये तिकीट आकारले जात आहे एसटी कर्मचाऱ्यांची संप पुकारल्याने खासगी वाहन चालकांची मनमानी पद्धतीने दर लागू केली आहे त्या तिकीट दरावर नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता आहे खाजगी वाहन चालकांनी प्रवाशांची लूट सुरू केली आहे तेव्हा आरटीओ विभागाने यांच्यावर कारवाई करावी असे सर्व सामान्य माणसांची मागणी आहे.