अंगारकी निमित्त गणपती मंदिरात भाविकांची गर्दी.
सुधीर पाटील-सांगली
अंगारकी संकष्टी निमित्त सांगलीच्या गणपती मंदिरात मंगळवारी भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. कोरोनाचे संकट कमी झाल्याने दीड दोन वर्षानंतर मंदिरे भाविकांसाठी खुली करण्यात आली आहेत. त्यामुळे मंगळवारी भाविकांमध्ये मोठा उत्साह होता. सांगलीच्या गणपती मंदिराबरोबरच हरीपुरच्या बागेतील गणपती मंदिरांमध्येही भाविकांची मोठी गर्दी होती.