गावठी बॉम्ब हाताळत असतांना स्फोट होऊन बाप ठार तर मुलगा गंभीर जखमी
इतरही 25 हात बॉम्ब सापडले,रायगड जिल्ह्यातील माणगांव तालुक्यातील घटना!
माणगाव
घटनास्थळी काही अंतरावर एका झाडावर लपवुन ठेवलेले 25 गावठी हातबाँम्ब सापडले आहेत. मध्यप्रदेशातील हे लोक पारधी समाजाचे असल्याची माहिती अप्पर जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल झेंडे यांनी प्रसार माध्यमांना दिली. या घटनेची माहिती मिळताच रायगड जिल्हा पोलिस अधीक्षक अशोक दुधे यांनी माणगाव उपजिल्हा रुग्णालयात भेट दिली.
संदेश आदिवासी चौहान (वय – 45), त्यांची पत्नी मजिनाबाई संदेश चौहान (वय -40), मुलगा सत्यम संदेश चौहान(वय -10) सर्व रा.सुरजासिंह 40 गाव बिराहली ता.रिथी जि.कठनी राज्य मध्यप्रदेश यांनी हे घटनास्थळी गावठी हात बॉम्ब मच्छिमारी व रानटी जनावरे यांची शिकार करण्यासाठी तयार करीत असत .ते माणगाव तालुक्यातील मशीदवाडी गावच्या हद्दीत धामणी नदी शेजारी शेतातील माळरानात उघड्यावर राहत होते. मंगळवार दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास यातील मयत संदेश चौहान हे शिकारीसाठी आणलेला हात बॉम्ब हाताळत असताना त्या बॉम्बचा अचानक स्फोट होऊन त्यामध्ये संदेश यांचा जागीच मृत्यू झाला.तर मुलगा सत्यम यास गंभीर दुखापत होऊन त्याची पत्नी माजीनाबाई हिला किरकोळ दुखापत झाली. घटनेतील गंभीर जखमी झालेल्या मुलाला तात्काळ माणगाव उपजिल्हा रुग्णालय याठिकाणी औषधोपचाराकरिता आणण्यात आले.याठिकाणी त्याच्यावर प्राथमिक औषधोपचार केल्यावर त्याची गंभीर परिस्थिती पाहून त्यास अधिक औषधोपचारासाठी एमजीएम रुग्णालय पनवेल येथे हलविण्यात आले आहे