कशेळे येथील आदिवासी तरुणाची आत्महत्या.
दिनेश हरपुडे- कर्जत
कर्जत तालुक्यात गुन्ह्यांचे तसेच आत्महत्या करण्याचे प्रकार वाढत आहेत.कशेळे येथील तरुण मंगेश दोरे हा कशेळे नाक्यावर एका भाजीच्या दुकानात काम करतो सोमवारी २२ नोव्हेंबर रोजी नेहमी प्रमाणे सकाळी ६ वाजता भाजीच्या दुकानावर कामावर गेला होता.परंतु रात्री ११:३० वाजले तरी तो घरी आला नव्हता.कधी कधी तो उशिरा येतो म्हणून घरचे आई,बाबा आणि भाऊ यांनी जेवण करून झोपी गेले .सकाळी ६ वाजता जेव्हा आई वनिता दोरे उठल्या तेव्हा दरवाज्याच्या बाहेरील कडीला भाजी पिशवी दिसली परंतु मंगेश घरी दिसला नाही.यासाठी दिवसभरात त्यांनी सर्व नातेवाईक यांच्याकडे विचारपूस केली तरीही मंगेश कुठेच आढळून न आल्याने आई वनिता यांनी २३ नोव्हेंबर रोजी कर्जत पोलीस ठाणे अंतर्गत कशेळे पोलीस दुरक्षेत्र येथे हरवल्याची नोंद केली करण्यात आली होती.
२४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी पोलिसांना श्रध्दा फार्म समोरच्या एका झाडाच्या फांदीला गळफास घेतलेला अवस्थेत असलेला इसम आढळला लगेच पोलिसांनी भाऊ हरेश दोरे यांना फोन करून बोलावले सदर व्यक्ती ही हरवलेला मंगेश दोरे असल्याची खात्री झाल्यावर मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी कशेळे ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. मंगेश आत्महत्या करणार नाही त्याचे काहीतरी घातपात झाल्याचा संशय नातेवाईक यांनी केला आहे.तरीही पुढील तपास पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार पी.व्ही.लोखंडे,पोलीस हवालदार ए.एम वडते,पो.ना सुग्रीव गव्हाणे करत आहेत.