कोंगनोळीत घराला आग साडेतीन लाखाचे साहित्य जळून भस्मसात
उमेश पाटील -सांगली
कोंगनोळी येथील गट नं.117 मध्ये असणाऱ्या शेतकरी गोविंद भीमराव पाटील यांच्या राहत्या घरात अचानक लागलेल्या आगीत रोख रकमेसह, संसारउपोयगी साहित्य व इतर घरातील साहित्य असे तीन लाख चौवेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जळून खाक झाला आहे.
मंगळवारी ही घटना घडली घटनास्थळी भेट देऊन तलाठी शिवाजी नरुटे यांनी कर्मचारी गवस मोहद्द्दीन मुुलानी व गोरख यमगर याांचे सह पंच मनोहर भुसनुर व निवास जाधव यांच्या उपस्थितीत जळीत स्थितीचा पंचनामा केला.
आगीत नुकसान झालेल्या वस्तूमध्ये आटाचक्की (सोळा हजार रुपये), लॅपटाप (बावीस हजार रुपये), संसार उपयोगी साहित्य (पासष्ट हजार रुपये), ज्वारी तीन पोती (सहा हजार रुपये), सोन्याचे दागिने एक तोळा (पन्नास हजार रुपये), व रोख रक्कम एक लाख पंचाऐंशी हजार रुपये असे मिळून एकूण तीन लाख चौवेचाळीस रुपयांचे साहित्य आगीत जळून खाक झाले आहे. अचानक लागलेल्या आगीत घरातील साहित्य व रोख रक्कम जळून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.