सामाजिक कार्यकर्ते भरत सावर्डेकर यांच्या लढ्याला यश पालवण प्रदूषित पाण्याची होणार चौकशी
आ.भास्कर जाधव यांनी अधिकारी वर्गाला दिल्या सूचना
ओंकार रेळेकर-चिपळूण
पालवण ग्रा.पं. पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून नळाला येणारे पाणीच दृषित व लाल येत असल्याने येथील
भरत सावर्डेकर यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या उपप्रादेशिक अधिकारी तसेच ग्रामपंचायत,
गटविकास अधिकारी यांना निवेदन देऊन तक्रार केली होती. याबाबत सावर्डेकर यांनी दिलेल्या निवेदनानुसार, गेल्या पंधरा दिवसाहून अधिक काळापासून पालवण येथे ग्रामस्थांना दूषित पाणीपुरवठा केला जात आहे. रसायनमिश्रीत पाणी
असल्याची शंका असून, या पाण्याला वासदेखील येत आहे. या शिवाय लाल रंगाचे पाणी नळाद्वारे येत असल्याने ग्रामस्थांना पिण्याचे पाणी मिळणे मुश्कील झाले आहे. याबाबत ग्रा.पं.ला निवेदन देण्यात आले. मात्र,ग्रा.पं.ने या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले होते संबंधित विभागाने या विषयी
गंभीर दखल घेतलेली नाही. पालवणमध्ये डेरवण येथे
शासनाच्या माध्यमातून बांधण्यात आलेल्या धरणाच्या पाण्यातून पाणीपुरवठा केला जातो. डेरवण येथून सोडण्यात आलेले पाणी नदीपात्राच्या प्रवाहातून अर्थात कापसी नदीतून सावर्डा, आगवे, मांडकी, ढोक्रवली असे वाहत जाऊन पुढे भातगाव धरणाला मिळते. कापसी नदीपात्राशेजारी पालवण नळपाणी
योजनेची विहीर बांधण्यात आली आहे व तेथून पाणी उचलले जाते व ते नेटकेश्वर मंदिर मांडकी येथे साठवण टाकीमध्ये जमा करून पाईपलाईनने
ग्रामस्थांना दिले जाते. प्रादेशिक पाणी योजनेच्या माध्यमातून ग्रामस्थांना हे पाणी देण्यात येत आहे. प्रदूषित पाणी साठवण विहिरीत झिरपल्याने रसायनमिश्रीत पाणी पाईपलाईनमधून लोकांच्या घरामध्ये येत आहे असा अंदाज आहे. त्यामुळे या बाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाने तत्काळ दखल घ्यावी आणि ही मूलभूत गरज लक्षात घेऊन पाणीपुरवठा समिती, सरपंच यांनी तातडीने नियोजन करणे गरजेचे
होते. मात्र, गेले अनेक दिवस दूषित पाणीपुरवठा होत असताना आपल्या निवेदनाची दखल ग्रामपंचायत आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाने वेळीच घेतली न्हवती. पाणी विषयावर आमदार भास्कर जाधव यांनी पंचायत समिती सभागृहात सोमवारी घेतलेल्या विशेष सभेत भरत सावर्डेकर यांचे म्हणणे ऐकून पालवण ग्रामपंचायत आणि ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील अभियंता अविनाश जाधव यांना प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करून अहवाल सादर करण्याचा सूचना केल्या आहेत.
या बाबत सविस्तर वृत्त असे की चिपळूण पंचायत समिती येथे दि. २२ नोव्हेंबर रोजी आमदार भास्करराव जाधव यांनी सभा आयोजित केली होती. या सभेत भरत मारुती सावर्डेकर यांनी ग्रामपंचायत पालवण यांच्या माध्यमातून पुरवठा होत असलेल्या प्रदुषित पाण्याविषयी प्रश्न मांडला. ग्रामसेवक प्रमोद दाते यांना आ.जाधव यांनी विचारणा केली असता ग्रामसेवकानी प्रदुषित पाण्याचा प्रवाह होत असल्याचा मान्य केले. त्या अनुषंगाने जिल्हा परिषद, ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग चिपळूण सहाय्यक अभियंता अविनाश जाधव यांस तात्काळ, येत्या दोन दिवसात पालवण गावातील पाणी योजनेला भेट देऊन प्रदुषित पाणी कोठून कसे येतय याचा शोध घेऊन पाणी चाचणी अहवाल सादर करावा अशा सूचना केल्या.
या नंतर २३/११/२०२१ रोजी मौजे पालवण ग्रामपंचायतीच्या वतीने तातडीने सभा आयोजित करण्यात आली या सभेस ग्रामसेवक ,सरपंच सदस्य यांनी भरत सावर्डेकर अगत्याचे निमंत्रण देऊन सभेसाठी निमंत्रित केले होते. व सदरच्या प्रदुषित पाण्याविषयी काय उपाययोजना करता येतील यावर विचारविनिमय सल्लामसलत मार्गदर्शन करण्यास सांगितले.
आपल्या साठवण पाण्याच्या टाकीवर जलशुद्धीकरण केंद्र बसविण्यात आल्यास आपल्या गावातील ग्रामस्थांना रहिवाशांना त्याचा फायदा होईल व शुद्ध पिण्यायोग्य पाणी उपलब्ध होईल. तसेच चालू योजनेच्या साठवण टाक्या वाढवता येतील का? इतरत्र जागेतून मुबलक पाणी पुरवठा करण्याकरीता नवीन विहिरी बांधता येऊ शकते का? याचा आढावा घ्यावा व त्या प्रकल्पाचा आराखडा व त्यासाठी येणाऱ्या अंदाजित खर्चाचा अंदाज घेण्यात यावा असे भरत सावर्डेकर यांनी सुचविले. नंतर ग्रामसेवकांनी मुद्दा मांडला जो मुद्दा मांडलायत नियमित पाणीपुरवठा ते मला शक्य नाही परंतु दर दोन दिवसांनी दोन दिवस पुरेल इतका दोन्ही दिवसांचे पाणी उपलब्ध करून देण्याचे सावर्डेकर यांना मौखिक आश्वासन दिले.