लहान मुलांवर चांगले उपचार व्हावेत यासाठी सेमिनारचा चांगला उपयोग होणार !
पालकमंत्री अदिती तटकरे यांचे प्रतिपादन
तीन दिवसीय सेमिनार मध्ये राज्यातील तज्ञ डॉक्टरांचा सहभाग
अमूलकुमार जैन-अलिबाग
मुरुड तालुक्यातील काशीद येथील प्रकृती रिसॉर्ट येथे लहान बालकांवर होणारे विविध रोग व त्यावर होणारी उपचार पद्धती यावर विशेष तीन दिवसीय सेमिनार आयोजित करण्यात आले होते.यासाठी महारष्ट्रातील विविध बाळरोग तज्ञ डॉक्टर सहभागी झाले होते.
या सेमिनारच्या शेवटच्या दिवशी पालकमंत्री यांनी विशेष मार्गदर्शन करून उपस्थित राहिल्या होत्या यावेळी त्या आपल्या मार्गदर्शनपर भाषणात बोलत होत्या.
यावेळी डॉक्टर वाय.के. आमडेकर.डॉक्टर उदय बोधनकर.डॉक्टर राजू शहा डॉक्टर नितीन शहा,डॉक्टर विजय येवले.डॉक्टर बकुळ पारेख.डॉक्टर जयंत उपाध्येय,डॉक्टर राजीव धामणकर.डॉक्टर दाभाडकर.डॉक्टर महेश मोहिते.आदी सह असंख्य डॉक्टर यावेळी उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री अदिती तटकरे यांनी आपल्या भाषणात नमूद केले कि. कोरोनाच्या कोणत्याही लाटेशी सामना करण्याची आमची तयारी आहे.परंतु या सेमिनार मध्ये सुद्धा लहान मुलांना कोरोना झाल्यास एक अद्यावत व तांत्रिक पद्धतीने कसे उपचार करता येतील यासाठी येथील डॉक्टर यांनी विशेष आपला अनुभव लावला आहे.या सर्व अनुभवी डॉक्टर यांचा ग्रामीण भागातील डॉक्टर याना सुद्धा उपयोग झाला पाहिजे.तरच लहान मुलांचे आरोग्य सदृढ राहण्यास महत्वपूर्ण योगदान राहणार आहे.