शिवसैनिकांचा अभिनेत्री कंगना राणावत हिच्या बेताल वक्तव्याचा जोडे मारो आंदोलन करुन निषेध
कुलदीप मोहिते- कराड
अभिनेत्री कंगना राणावत हिने केलेल्या बेताल वक्तव्याचा निषेध म्हणून उंब्रज ता कराड येथील शिवसैनिकांच्या वतीने जोडे मारो आंदोलन करण्यात आले .1947 ला भारताला स्वातंत्र्य मिळाले नसून 2014 साली मिळाले आहे. 1947 साली मिळालेले स्वातंत्र्य हे भीक आहे या कंगना राणावतच्या बेताल वक्तव्याचा उंब्रज येथील शिवसैनिकांनी निषेध करून अभिनेत्री कंगना राणावत च्या पोस्टर वर जोडे मारो आंदोलन केले.
तिचे वक्तव्य हे समस्त देशभक्त आणि स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या स्वातंत्र्यवीरांचा हा घोर अपमान आहे,हे बेताल वक्तव्य देशद्रोह असून तिच्यावर गंभीर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी यावेळी उंब्रज येथील शिवसैनिकांच्या वतीने करण्यात आली आहे.पद्मश्री पुरस्कार मिळाल्या नंतर बेभान झालेल्या अभिनेत्री कंगना राणावत हिने केलेलं वक्तव्य हे अतिशय बेताल आणि आपल्या देशाला स्वतंत्र मिळण्यासाठी ज्या क्रांतीवीरांनी आपले बलिदान दिले ते सर्व व्यर्थ आहे आणी या वकव्यामुळे सर्व देशवासीय आणि देशभक्त यांचा घोर अपमान झाला असून या बद्दल कंगना राणावत हिला कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि राष्ट्पती यांनी तिला दिलेला पुरस्कार हा परत घेतला पाहिजे असे मत शिवसेना जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार यांनी आंदोलनाच्या वेळी उंब्रज येथे केले .यावेळी शिवसेना सातारा जिल्हाप्रमुख शिवसेना जयवंतराव शेलार जिल्हाउपप्रमुख रामभाऊ रैनाक महिला आघाडीच्या अनिता जाधव कराड उत्तर तालुकाप्रमुख सतीश पाटील उंब्रज विभागप्रमुख संतोष बेडके जिल्हा दक्षता समितीचे राजेंद्र माने उपतालुकाप्रमुख दत्तात्रय पवार संजय भोसले अविनाश देशमुख सोमनाथ लोहार सचिन जाधव यांच्यासह शिवसेना महिला आघाडीच्या कार्यकर्त्या या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या