पुण्यातील बिबेवाडी परिसरामध्ये MNGL ची लाईन JCB ने फुटल्याने मोठी आग
प्रियांका ढम-पुणे
पुण्यातील बिबेवाडी परिसरामध्ये JCB मुळे MNGL ची लाईन फुटल्याने मोठी आग भडकली होती. साधारण दीड तास Aहे तांडव चालू होते. रात्रीच्या सुमारास मोठा आवाज होऊन आगीचा भडका उडाला. मोठ्या आवाजाने तेथेच शेजारील बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या नगरसेविका रुपाली धाडवे यांनी तात्काळ गांभीर्याने लक्ष घालून अग्निशमन दलाला घटनेची माहिती दिली. व तेथे आग लागलेल्या परिसरात आणखी मोठा अनर्थ घडू नये म्हणून तेथील जवळपासच्या नागरिकांना घटनेच्या स्थळापासून सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. तसेच या घटनेबाबत तेथील संबंधित ठेकेदाराला याबाबत जाब विचारण्यात असून पुढील चौकशी सुरु असल्याचे धाडवे यांनी सांगितले.