बिगारी कामगारांचे पाळणा घर!
संजय गायकवाड-कर्जत
पूर्वी एकत्र कुटुंब पध्द्ती होती त्यामुळे लहान मुलांचा सांभाळ आजी -आजोबा करायचे, आता नोकरी कामधंदे यामुळे एकत्र कुटुंब पद्धती मोडीत निघाली.नोकरी निमित्त पालक बाहेर जातात त्यांची मुले सुखरूप राहावीत त्यांचा सांभाळ व्हावा म्हणून ती पाळणा घरात ठेवली जातात, त्यामुळे पाळणाघर ही संकल्पना उदयास आली, सायंकाळी आई वडील कामावरून आली की ते आपल्या मुलांना घरी घेऊन जातात.
मात्र इमारतीवर बिगारी काम करणारे जोडपे कामावर आल्यावर त्यांना पाळणाघर न परवडणारे असते ते आपली मुले घेवून इमारतीवर बिगारी काम करायला येतात, काम करायला लागल्यावर आपले मुलं कुठे ठेवायचे तर इमारतीच्या आवारात सावली व योग्य जागा निवडून त्या ठिकाणी साडीच्या आधारे पाळणाघर तयार करतात व आपले मुलं त्यामध्ये ठेवून काम करतात.
असेच कर्जत शहरात एका इमारतीचे काम सुरू आहे याठिकाणी साडीचा उपयोग करून पाळणाघर माऊलीने तयार केले आणि त्यामध्ये आपल्या चिमुकल्याला ठेवून बिगारी काम करताना दिसत आहे.