डी.पी. बंद
शेतकरी अडचणीत
सुधीर पाटील-सांगली
तासगांव तालुक्यात महावितरण कडून शेतीपंपाचे विज बील वसुलीसाठी डी .पी. बंद करण्याचे काम सुरू आहे . अवकाळी पावसाने द्राक्ष बागायतदार शेतकरी पुर्णपणे उध्दवस्त झालेला आहे . अशातच महावितरण डी.पी. बंदचा कार्यक्रम राबवत आहे . डी.पी. बंद केल्यामुळे जनावरांना पाणी, द्राक्षबागेला औषध फवारणी साठी पाणी ,शेतीसाठी पाणी या सर्व अडचणी निर्माण झाल्यानंतर सर्व शेतकऱ्यांनी निमणी सबस्टेशनचे सहाय्यक अभियंता नलवडे यांच्याकडे धाव घेतली .व विदयुत पुरवठा सुरु करण्याची विनंती केली .
यावेळी निमणी ,नेहरूनगर,नागांव, तुरची येथील शेतकऱ्यांनी शेती वीजपंपांची बीले विद्युत वितरण कंपनीकडे मागणी करुन घेऊन तपासावीत , चुकीच्या बिलांची दुरूस्ती करून घ्यावी. सर्वांनी ऑनलाईन बीले डाऊनलोड करून वितरण कंपनीने दिलेले बील व ऑनलाइन बील यांमध्ये फरक आहे काय याची खात्री करून घ्यावी .व बील भरावे. असे आवाहन निमणीचे माजी उपसरपंच आर.डी. पाटील यांनी केले .
विद्युत पुरवठा खंडित करण्याची कारवाई व वीज बिलांच्या आकारणी बाबत निमणी सबस्टेशनचे सहाय्यक अभियंता नलवडे यांच्या समवेत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पाटील पुढे म्हणाले , सप्टेंबर २०२० अखेरच्या थकबाकी पोटी प्रत्येक ग्राहकाला कंपनीने मागणी नोटीसा तयार केल्या आहेत .त्यामध्ये एकुण थकबाकी वर मिळणारी सुट व भरावी लागणारी रक्कम याचा उल्लेख केला .आहे ती नियमाप्रमाणे आहे का त्याची खात्री करावी.
सप्टेंबर २०२१ नंतरची बीले ही चालु बीले म्हणून दिली आहेत. विद्युत पुरवठा खंडित होऊन शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून ज्याचे चालू बील रु १५००० पेक्षा कमी आहे त्यांनी रु ३००० व ज्याचे चालू बील रु १५००० पेक्षा जास्त आहे त्यांनी रु ५००० भरण्याची तयारी दाखवली आहे .त्या प्रमाणे सर्वांनी गुरुवार दिनांक २३/१२ पर्यंत रक्कम जमा करून पावती घ्यावी.
या अडचणींवर मार्ग काढण्यासाठी विशेष ग्रामसभा घेण्याच्या सूचना ग्रामपंचायतीच्या पदाधिकऱ्यांनी दिल्या आहेत .सर्वांनी यावेळी उपस्थित राहावे असे आवाहन त्यांनी केले आहे.
यावेळी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष आप्पासाहेब पाटील, पोलीस पाटील, सतिश पाटील, प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष सुधीर पाटील, दिपक विलासराव पाटील, डी. ए . पाटील, शिवाजी जाधव, युवराज पाटील,राजु जाधव ,जगदीश चौगुले, भानुदास पाटील, रंगराव गायकवाड, मच्छिंद्र गायकवाड, संतोष चौगुले, प्रशांत पाटील,नाना शेळके, भाऊसाहेब गायकवाड, आदी शेतकरी उपस्थित होते .