वीणाताई गावडे आणि योगेश वसंत त्रिवेदी यांना एनयुजेचा पहिला जीवनगौरव पुरस्कार !
रायगडचे जिल्हा माहीती अधिकारी मनोज सानप यांचाही होणार विशेष सन्मान!
महाराष्ट्र मिरर टीम-मुंबई
- शरद पवार, डॉ. भालचंद्र मुणगेकर, संजय राऊत आणि राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांची उपस्थिती
- शुक्रवारी शानदार समारंभात सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार !
- एनयुजे महाराष्ट्र अधिवेशन व गौरव सोहळ्यात विविध मान्यवरांचा होणार गौरव!
- एनयुजे इंडिया नवी दिल्ली संलग्न व आयएफजे ,ब्रुसेल्स सदस्य नॅशनल युनियन ऑफ जर्नलिस्ट्स महाराष्ट्रचे राज्यस्तरीय अधिवेशनव गौरव सोहळा 24 डिसेंबर रोजी सुरेंद्र गावस्कर सभागृह ,मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय दादर पूर्व येथे सकाळी 10.30 ते 1 या कालावधीत संपन्न होणार आहे.
या वेळी खासदार शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि माजी कुलगुरू डॉ भालचंद्र मुणगेकर यांच्या विशेष उपस्थितीत संपन्न होणाऱ्या या गौरव सोहळ्याचे अध्यक्ष दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक खासदार संजय राऊत असणार आहेत. या अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष सांस्कृतिक, आरोग्य राज्य मंत्री डॉ राजेंद्र पाटील-यड्रावकर असुन पत्रकारांसह ,जनसंपर्क तसेच विविध क्षेत्रातील सामाजिक बांधिलकीतून लोकशाही बळकटीसाठी सक्षम समाजासाठी काम करणाऱ्यां व्यक्ती व संस्थाचा गौरव मान्यवरांची हस्ते करण्यात येणार आहे. तसेच पत्रकारितेचे अर्थात लोकशाहीचे भविष्य याविषयावर महत्त्वपूर्ण मंथन होणार आहे.तर एनयुजे महाराष्ट्रचा पहिला जीवनगौरव पत्रकारितेसाठी ज्येष्ठ पत्रकार योगेश वसंत त्रिवेदी आणि माहिती व जनसंपर्कासाठी वीणाताई गावडे यांना देऊन गौरविण्यात येणार आहे. तर किशोरी पेडणेकर (महापौर,मुंबई ), मा ज्योती ठाकरे अध्यक्ष: महिला आर्थिक विकास मंडळ ( कार्य: महिला ,उद्योग) मा राजुल पटेल :सभापती आरोग्य समिती, मुंबई महानगरपालिका यांचा त्यांचे उल्लेखनीय कार्यासाठी गौरव करण्यात येणार आहे. तर मा. गणेश नायडू ( मालक, लोकशाही वाहिनी)-मा.पूनम मिश्रा , ( उपसंपादक, दैनिकभास्कर, औरंगाबाद ) ,मा .सचिन चिटणीस- (छायाचित्र पत्रकार ते डिजिटल पत्रकार (संपादक: मुंबई न्यूज 24/7 ) , मा.शशिकान्त सिंह- (उपसंपादक-यशोभूमी) , मा.निखील देशपाडे- ( आउटपुट हेड-न्यूज 18 लोकमत ) मा. वैदेही काणेकर (वरिष्ठ वार्ताहर साम टिव्ही ) मा.लक्ष्मीकांत घोणसेपाटील (पत्रकार TV9 मराठी ) , मा. वैजंता गोगावले ( सिनियर असिस्टंट प्रोड्युसर TV9 मराठी डिजिटल),या माध्यम क्षेत्रातील गुणवंतांचा गौरव होणार आहे
तर माहिती व जनसंपर्कासाठी उल्लेखनीय योगदान देणाऱे
मा.मनोज वराडे(जनसंपर्क अधिकारी बिईएसटी) ,मा. मनोज सानप ( जिल्हा माहिती अधिकारी, रायगड ), मा. मुकुंद चिलवंत (जिल्हा माहिती अधिकारी,औरंगाबाद ) मा. डॉ. मिलिंद आवताडे ( मुख्य जनसंपर्क अधिकारी:महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी (महापारेषण) तर कामगार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी मा.निलांबरी भोसले (कामगार उप आयुक्त, मुंबई ) मा.शैलेश बळवंत पोळ ( कामगार उप आयुक्त (ग्रा वि) मुंबई ) जनसुरक्षा कार्यासाठी मा इन्स्पेक्टर राजेश येवले - ( एनडी आर एफ- महाराष्ट्र प्रमुख ) शिक्षण व सामाजिक कार्यासाठी मा सुवर्णा चंद्रकांत पाटील- शिक्षिका: (श्री अबिका विद्यामंदिर ,तोंडोली,वीटा) आरोग्य सेवेसाठी* मा.डॉ प्रविण बांगर ( मुख्यवैद्यकीय अधिकारी,के ई एम हॉस्पिटल) , मा. प्रकाश काळे ( खा राहूल शेवाळे, आरोग्य सेवा मदत ) प्रशासनिक व जनसेवेसाठी मा.स्वप्निल तागडे (प्रांताधिकारी ,वसई) मा.आदिक पाटील (तहसीलदार: ठाणे) ,मा.उज्ज्वला भगत : (तहसीलदार: वसई ) सामाजिक कार्यासाठी मा.राजेश शेट्ये ,मा. जॉय भोसले, मा .मयूर कांबळे तर सामाजिक विकासासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्यां संस्था 1) प्रोजेक्ट्स मुंबई ( कार्य: सामाजिक, पर्यावरण) चे :संस्थापक, सिईओ मा.शिशिर जोशी , 2)गादीया ग्रुप (कार्य: उद्योग, सामाजिक) चे चेअरमन- मा शिरीष गादीया, 3) ऑक्सिकूल पॅकेज ड्रिंकिंग वॅाटर कंपनी- पुणे : व्यवस्थापक - मा.प्रदीप पंडित
4)डॉ.जे.जे.मगदूम चॅरिटेबल ट्रस्ट ,जयसिंगपूर ( कार्य:शिक्षण, सामाजिक ) चे चेअरमन - मा.डॉ.विजयराज मगदूम 5)अवनी, मुंबई- (कार्य -स्वयंरोजगार,सामाजिक ) चे संस्थापक मा अनिल फोंडेकर यांचा गौरव करण्यात येणार आहे. तसेच आरोग्य, शिक्षण, सामाजिक ,सांस्कृतिक कार्यकर्ते पत्रकार यांना सन्मानित करण्यात येणार आहे.यात
डॉ. नितीन खामकर( वैद्यकीय क्षेत्र) काश्मिरा गुंडेविया (संचालक, जे जे ग्रुप ऑफ स्कुल मुंबई) दिलीप ठाकूर (सिने पत्रकार) अर्चना नेवरेकर( अभिनेत्री, निर्माती)
हरी पाटणकर (नाट्य व्यवस्थापक) रियाज देशमुख( निवृत्त पोलीस अधिकारी ते पत्रकार) आदिचा समावेश आहे
या कार्यक्रमाला मान्यवर नेत्यांसह कलावंतांची लक्षणीय उपस्थिती असणार आहे. अशी माहिती अधिवेशन निमंत्रक एनयुजे महाराष्ट्र अध्यक्ष शीतल करदेकर यांनी दिली. हा कार्यक्रम कोरोना आपत्कालीन निर्बंध नियम पालन करून आयोजित करण्यात येत असल्याचे संघटन सचिव कैलास उदमले व सरचिटणीस सीमा भोईर यांनी आवर्जून सांगितले