नरेडकोच्या वतीने नेरळ येथे बिल्डरांसाठी मार्गदर्शन
आदित्य दळवी-कर्जत
नॅशनल रियल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल यांच्यावतीने आज नेरळ बिल्डरांसाठी मार्गदर्शन शिबिर संपन्न झालं.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अमिराती Acme ग्रुपचे चेअरमन प्रवीण दोशी, रियल इस्टेट टॅक्स एक्सपर्ट आणि लेखक सीए मनिष गुप्ता,सीए विवेक लद्धा यांनी टॅक्स प्लॅनिंग फॉर बिल्डर अँड डेव्हलपर या विषयावर या त्यांनी विवेचन केले.आणि उपस्थित बिल्डरांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे सीए गुप्ता आणि सीए विवेक लद्धा यांनी दिली.
नरेडको प्रोग्रेसिव्ह नेरळ कर्जत यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले .नेरळच्या या भागात संभाव्य मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा येत असून नागरिकांनी याचा फायदा घ्यावा असे आवाहन नरेडकोचे नेरळचे अध्यक्ष गौतम ठक्कर यांनी महाराष्ट्र मिररशी बोलताना सांगितले तर नेरळमध्ये अधिक पायाभूत सुविधा उपलब्ध होण्यासाठी स्थानिक सरपंच ,आमदार आणि पालकमंत्री यांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू असल्याचे बिल्डर वीरेंद्र जाधव यांनी सांगितले.