मॅरेथॉन शर्यतीत सहभाग घेण्याची तीव्र इच्छा असल्याने अमेय रोज करतोय धावण्याचा सराव.
अमेय म्हात्रेने बोरी ते कर्नाळा अंतर २ तास २५ मिनिटांत धावून केले पार.
अमूलकुमार जैन-अलिबाग
रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील बोरी गावाचा सुपूत्र अमेय चंद्रकांत म्हात्रे याने आज दिनांक २६ डिसेंबर रोजी पहाटे ५ वाजता बोरी ते कर्नाळा हे २६ किमी अंतर २ तास २५ मिनिटात धावून पार करण्याचा पराक्रम केला आहे.
रायगड जिल्ह्यात होणाऱ्या वेगवेगळ्या मॅरेथॉन स्पर्धांमध्ये अमेय म्हात्रे यास सहभाग घेण्याची तीव्र इच्छा असल्याने अमेय रोज धावण्याचा सराव करीत असतो.
घरची बेताची परिस्थिती असताना प्रचंड इच्छा शक्तीच्या जोरावर त्याने सराव सुरू ठेवला आहे.या आधी ही बोरी ते अलिबाग हे २६ किमी अंतर त्याने २ तास ३९ मिनिटात पार केले होते. हनुमान क्रीडा मंडळ या संघातून तो कबड्डी खेळतो.
अमेयला योग्य व शास्त्रशुद्ध मार्गदर्शन व प्रशिक्षण मिळाले तर तो नक्कीच मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होऊन पेण तालुक्याचे नाव मोठे करू शकतो.
अमेय च्या या धाडशी उपक्रमात त्याचे मनोधैर्य वाढविण्यासाठी संगम म्हात्रे, प्रणित मोकल, जितू म्हात्रे, विकी म्हात्रे यांनी त्याला साथ केली.