Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

थर्टी फर्स्टचं सेलिब्रेशन!

 थर्टी फर्स्टचं सेलिब्रेशन!

 नियमांचे काटेकोरपणे पालन करा अन्यथा कठोर कारवाईचा बडगा !

हॉटेल आणि रिसॉर्ट मालकांना तहसीलदारांचा इशारा!

              संजय गायकवाड-कर्जत


 शासकीय नियमांचे काटेकोरपणे पालन करा, नियमांचे उल्लंघन करतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असा सज्जड इशारा कर्जतचे तहसीलदार विक्रम देशमुख यांनी नेरळ इथे हॉटेल आणि रिसॉर्ट मालकांच्या बैठकीत दिला.

              कोव्हीड-19 विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नववर्षाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना करणेबाबाबत कर्जत तालुक्यातील नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हॉटेल मालक व रिसॉर्ट मालक यांची बैठक नेरळ पोलीस ठाण्याच्या सभागृहात आयोजित केली होती, याप्रसंगी तहसीलदार विक्रम देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे, नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र तेंडुलकर उपस्थित होते.

                31 डिसेंबर व नववर्षाच्या अनुषंगाने कोरोना विषाणू व नविन विषाणू प्रजाती ओमीक्रॉंन च्या संक्रमणाचा प्रसार रोखण्याच्या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आली होती, राज्यातून,जिह्यातून येणारे प्रवाशी, पर्यटक यांनी लसीकरणाचे दोन्ही डोस घेतलेले असणे आवश्यक आहे, तसेच सर्व नागरिकांनी मास्क परिधान करणे आवश्यक आहे अश्या सूचना प्रामुख्याने देण्यात आल्या, तसेच कोव्हीड अनुरूप नियमांचे उल्लंघन करण्या-या हॉटेल मालक, रिसॉर्ट मालक व सामान्य नागरिक यांना दंड व शास्ती करण्यात येईल अशा सूचना या बैठकीत देण्यात आल्या.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies