सावधान कर्जतकरांनो!
थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर कर्जत तालुक्यात तीन फिरती पथके तयार
संजय गायकवाड-कर्जत
कोरोना विषाणूच्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांमध्ये ओमीक्रॉंन ही नविन विषाणू प्रजाती आढळून आल्यामुळे संसर्गाचा नविन धोका निर्माण झाला आहे.या अनुषंगाने कर्जत तालुक्यात खबरदारी म्हणून इंन्सीडंट कमांडर तथा तहसीलदार विक्रम देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात फिरण्यासाठी तीन पथके तयार करण्यात आली आहेत, ही पथके कधीही , कुठेही भेट देवून नियमांचे पालन होत आहे की नाही याची पाहणी करणार आहेत.
कोरोना विषाणूच्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांमध्ये ओमीक्रॉंन ही नविन विषाणू प्रजाती आढळून आल्यामुळे संसर्गाचा नविन धोका निर्माण झाला आहे. या ओमीक्रॉंन विषाणू प्रजातीचे संक्रमण सामान्य नागरिकांमध्ये, रहिवाशांमध्ये फार मोठ्या तीव्रतेने पसरण्याची दाट शक्यता आहे या पार्श्वभूमीवर शासनाने नागरिकांच्या आरोग्याचा दृष्टीने खबरदारी म्हणून नियमावली तयार केली आहे, मार्गदर्शक सूचनांच्या अनुषंगाने अटी व शर्तीचे पालन होत नसेल तर दंड व शास्ती करण्यात येणार आहे अशी माहिती तहसीलदार विक्रम देशमुख यांनी दिली.
लग्न, हळदी समारंभ सामाजिक कार्यक्रम येथे अचानक भेट देण्यासाठी एक महसूल नायब तहसीलदार, दोन विस्तार अधिकारी, दोन नगरपरिषद कर्मचारी आणि दोन पोलीस कर्मचारी असे सात जणांचे पथक नेमण्यात आले आहे.
हॉटेल, रिसॉर्ट, स्पा, सिनेमागृह व थिएटर येथे अचानक भेटी देण्यासाठी नायब तहसीलदार, दोन मंडळ अधिकारी, दोन नगरपरिषद कर्मचारी, एक सहाय्यक पोलीस निरीक्षक,पोलीस उपनिरीक्षक, दोन पोलीस कर्मचारी असे नऊ जणांचे पथक नेमण्यात आले आहे.
सार्वजनिक ठिकाणी तसेच गर्दीच्या ठिकाणी विनामास्क फिरणाऱ्या व्यक्ती अति व शर्तीचे पालन करत नसतील तर त्यांच्यावर दंड व शास्ती करण्यासाठी एक नायब तहसीलदार,दोन मंडळ अधिकारी, नऊ तलाठी, एक नगर परिषद कर्मचारी आणि दोन पोलीस कर्मचारी असे पंधरा जणांचे पथक नेमण्यात आले आहे.