जागतिक दिव्यांग दिनानिमित्त जनकल्याण दिव्यांग बहुउद्देशीय विकास संस्था उंब्रज दिव्यांग मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन
कुलदीप मोहिते-कराड
जनकल्याण दिव्यांग बहुउद्देशीय विकास संस्था उंब्रज नेहमीच दिव्यांगांना येणाऱ्या सामाजिक व शासकीय समस्या सोडवण्यात अग्रेसर असते यावेळी 3 डिसेंबर जागतिक दिव्यांग दिन (अपंग दिन) चे औचित्य साधून जनकल्याण दिव्यांग बहुउद्देशीय विकास संस्था उंब्रज यांच्यावतीने मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन संत निरंकार भवन उंब्रज येथे करण्यात आले होते श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून पुतळ्यापासून संत निरकर भवना पर्यंत भव्य दिव्य अशी घोषणा मय वातावरणात रॅली काढण्यात आली नंतर संत निरंकार भवन उंब्रज येथे मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी संगीता साळुंखे (माई) या होत्या अंतर दिव्यांगांच्या अंतकरणात दूरदृष्टी असल्याने त्यांना अनेक व्याधी संकटे असून देखील ते आपले ध्येय समोर ठेवून ते साध्य करण्याची जिद्द बाळगून असाध्य ते साध्य या उक्तीप्रमाणे आपले जीवन जगत आहेत याचा आम्हास सार्थ अभिमान वाटतो असे प्रतिपादन सौ संगीता तानाजी साळुंखे अध्यक्ष माई चारीटेबल ट्रस्ट यांनी यावेळी केले तसेच दिव्यांग म्हणजे भव्य दिव्य इच्छा बाळगणारे असे गौरवोद्गार यांनी यावेळी काढले नजिकच्या काळामध्ये ट्रस्ट मार्फत आरोग्य शिबिराचे आयोजन करून संस्थेला लागणारे तांत्रिक साहित्य देण्याचे ठोस आश्वासन त्यांनी यावेळी दिले मेळाव्याचे प्रमुख पाहुणे नवनिर्वाचित तहसीलदार विजय पवार यांनी दिव्यांगांच्या समस्या जाणून घेऊन केंद्र व राज्य सरकारच्या योजना उदाहरणार्थ संजय गांधी पेन्शन योजना अंत्योदय रेशन कार्ड घरकुल योजना अपंग प्रमाणपत्र इत्यादी शासकीय योजनांमध्ये सुलभता आणण्याचा प्रयत्न करून दिव्यांगांना त्यांचा शंभर टक्के लाभ करून देण्याची ग्वाही नवनिर्वाचित तहसीलदार विजय पवार यांनी मेळाव्याच्या वेळी दिली जनकल्याण विकास संस्थेच्या कार्याची प्रशंसा करून इतर संस्थांनी याचा आदर्श घ्यावा असे मेळाव्यास संबोधित केले तसेच मेळाव्यास उपस्थित मान्यवर उंब्रज पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांनी दिव्यांग बांधवांच्या साहसी प्रवृत्तीचे कौतुक करून पोलीस खात्याकडून सर्वतोपरी मदत करण्याचे ठोस आश्वासन त्यांनी यावेळी दिले आनंदा पोतेकर यांनी मेळाव्यास मार्गदर्शन केले तसेच या मार्गदर्शन मेळाव्यात दिव्यांग गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला
उंब्रज विभागातील आदर्श प्राध्यापक शिक्षण सेवा गौरव पुरस्काराने सन्मानित तानाजी कदम सर यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला दिव्यांगांना सर्वसामान्य प्रमाणे जगता यावे यासाठी व्यक्ती हक्क अधिनियम 2016 व शासन निर्णय 2018ची अंमलबजावणी शासनाने प्रभावीपणे करावी जनतेच्या मनामध्ये दिव्यांग याबाबत आपुलकीची भावना निर्माण झाली तरच जागतिक अपंग दिनाचे सार्थक होईल दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी अधिकारी सामाजिक राजकीय क्षेत्रातील व्यक्तींनी पुढाकार घ्यावा असे आवाहन कदम सर यांनी यावेळी केले कोरोना महामारी च्या पार्श्वभूमीवर शासनाने घालून दिलेल्या सर्व नियम व अटींचे पालन करून अगदी साध्या पद्धतीने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते
या मार्गदर्शन मेळाव्यास उंब्रज ग्रामपंचायत सरपंच योगराज जाधव उपसरपंच सौ सुनंदा विनायक जाधव ग्रामपंचायत सदस्य विजय जाधव वैद्यकीय अधिकारी उंब्रज प्राथमिक आरोग्य केंद्र डॉक्टर स्नेहा निकम युवराज काटे मंडलाधिकारी गाव कामगार तलाठी एस एस काळे ग्राम विकास अधिकारी उंब्रज बी एस चव्हाण या प्रमुख मान्यवरांची उपस्थिती लाभली तसेच या मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन संस्थेचे सचिव प्रमोद गायकवाड दीपक खडग अरविंद जाधव सुनील हजारे उमेश शेटके महेश काशीद दिगंबर भांदिर्गे अनिल आटोळे छाया पाटील शोभा वाघमारे सागर जंगम यांनी केले प्रास्ताविक कदम सर यांनी केले व आभार रमेश जाधव यांनी मानले