जिल्ह्यात परदेशी फिरून आलेल्या नागरिकांच्या येण्याने घबराटीचे वातावरण
मिलिंद लोहार-सातारा
फलटण येथे दक्षिण आफ्रिका , इंग्लंड , न्यूझीलंड मधून आलेल्या सहा परदेशी प्रवाशांचे नमुने दिनांक 13/12/2021 रोजी जिल्हा रुग्णालय सातारा येथे तपासण्यात आले. त्यामध्ये आफ्रिकेतून आलेल्या तीन प्रवाशांचे नमुने पॉझिटिव्ह आले. एक प्रवासी इंग्लंड व एक प्रवासी न्यूझीलंडचा मधून पॉझिटिव आला. आणि एक नमुना नेगेटिव आला.
उद्या आम्ही GWS साठी NIV पुणे येथे 5 नमुने पाठवू.
फलटण येथे दक्षिण आफ्रिकेतून आलेले चार प्रवासी उपजिल्हा रुग्णालय फलटण येथे दाखल करण्यात आलेले आहेत. त्यापैकी तीन प्रवासी पॉझिटिव्ह असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. सदर रुग्णांमध्ये कोणतेही चिन्ह लक्षणे नाहीत व साच्युरेशन 99% आहे
डॉ. सुभाष चव्हाण
जिल्हा शल्य चिकित्सक सातारा