अलिबाग शहरातील एमव्हीएम टॉकीज परिसरात खुलेआम मद्यपान:संबंधित विभागाचे दुर्लक्ष
अमूलकुमार जैन -अलिबाग
अलिबाग पोलीस ठाणे आणि पोलीस अधीक्षक कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात असणाऱ्या ब्रम्हा विष्णू महेश टॉकीज,रायगड जिल्हा बँक,आणि आय लव्ह अलिबाग यांच्या जवळ असणाऱ्या मोकळ्या जागेत रात्री पाच सहा जण एकत्रित येत ते खुलेआम मद्यपान करीत होते. ते मद्यपान करीत असताना एकमेकांना अश्लील भाषेत चर्चा करीत होते.
नूतन वर्षाला काही तासांचा अवधी राहिला असताना जिल्हा प्रशासन जिल्हयातील विविध ठिकाणी बंदोबस्त करण्यासाठी पथक तयार केले आहे मात्र अलिबाग पोलिसांचे पथक हे अलिबाग शहरात फिरत की नाही अशी छुपी चर्चा त्या परिसरात असलेल्या पान टपरी येथे होत आहे.