अभिनेते अशोक सराफ यांच्या हस्ते श्री क्षेत्र टेरव भवानी वाघजाई देवस्थान दिनदर्शिकेचे प्रकाशन
ओंकार रेळेकर-चिपळूण
श्री क्षेत्र टेरव श्री भवानी - वाघजाई देवस्थान २०२२च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन व लोकार्पण सोहळा प्रख्यात व ज्येष्ठ अभिनेते श्री अशोक सराफ यांचा शुभहस्ते नुकताच पार पडला. गेली दहा वर्षे भाविक व ग्रामस्थांना दर्जेदार आणि परिपुर्ण अशी दिनदर्शिका भेट देण्यात येत आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षीही देवस्थानच्या या दिनदर्शिकेेला वाढती मागणी आहे. देवस्थानात तसेच गावात साजरे होणारे सण, उत्सव व इतर सर्व कार्यक्रमांची माहिती सदर दिनदर्शिकेत देण्यात आली आहे