महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना चवदार तळ्यावर मेणबत्या लावुन केले अभिवादन
अमूलकुमार जैन-अलिबाग
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 6 डिसेंबर 1956 रोजी महापरीनिर्वाण झाले. आपल्या उद्धारकर्त्या महामानवाला अभिवादन करण्यासाठी आंबेडकर अनुयायी दादरच्या चैत्यभुमीवर जाऊन बाबासाहेबांना अभिवादन करतात. पण सर्वांनाच हि संधी मिळत नाही. याचा विचार करून बाबासाहेबांची कर्मभुमी असलेल्या महाडच्या चवदार तळ्यावर गेली अनेक वर्ष येथील दलित मित्र खांबे गुरुजी ट्रस्टच्या माध्यमातुन हा अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो या निमित्ताने महाडच्या चवदार तळ्यावर मेणबत्या लावण्यात आल्या. बुद्ध वंदना आणि दोन मिनिट स्तब्ध उभे राहून अभिवादन करण्यात आले. महाड आणि परीसरातील शेकडो आंबेडकरी अनुयायी या वेळी महामानवाला अभिवादन करण्यासाठी चवदार तळ्यावर उपस्थित होते.