Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

भाजपच्या दोन तालुका उपाध्यक्षांनी सहकार्यांसह शिवसेनेत केला प्रवेश

कर्जतमध्ये भाजपला शिवसेनेचा जोरदार झटका! 

भाजपच्या दोन तालुका उपाध्यक्षांनी सहकार्यांसह शिवसेनेत केला प्रवेश 

                ज्ञानेश्वर बागडे-कर्जत


 महाराष्ट्र राज्यातील शिवसेनाप्रणीत महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या सक्षम नेतृत्वाखाली संपूर्ण राज्यात विकासात्मक कामांना गती मिळाली आहे. त्यामुळे शिवसेनेचे सर्वेसर्वा तथा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व युवासेनाप्रमुख अदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून व स्थानिक कार्यसम्राट आमदार महेंद्र थोरवे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत भाजपचे तालुका उपाध्यक्ष पंढरीनाथ पिंपरकर व गौतम मुंढे यांनी आपल्या असंख्य सहकार्यांसह शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला.

            गुरुवार दिनांक १३  मार्च रोजी सकाळी आकरा वाजता शिवतीर्थ पोसरी येथे आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते शिवसेनेचा भगवा झेंडा उंचावत पाथरज जिल्हा परिषद विभागातील भाजपचे तालुका उपाध्यक्ष पंढरीनाथ पिंपरकर व सावेळे जिल्हा परिषद विभागातील भाजपचे दुसरे तालुका उपाध्यक्ष गौतम मुंढे यांनी आपल्या असंख्य सहकार्यांसह शिवसेनेत जाहिर पक्षप्रवेश केला. त्याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख भाई गायकर, विधानसभा संपर्कप्रमुख पंकज पाटील, तालुका संघटक शिवराम बदे, उपतालुकाप्रमुख दिलीप ताम्हाणे, नगरसेवक संकेत भासे, जिल्हा परिषद विभागप्रमुख योगेश दाभाडे, पंचायत समिती विभागप्रमुख संदेश सावंत, बाजीराव दळवी, रमेश मते, ज्ञानेश्वर भालिवडे, उत्तम शेळके, नितीन धुळे, भगवान घुडे, विजय घुडे, मंगेश सावंत, संतोष पिंपरकर, सोपान भालिवडे, नवनाथ कदम, रामदास घरत, महेश घुडे,  संतोष घुडे आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 भाजपमधील या दोन दिग्गज नेत्यांसह युवा कार्यकर्ता हर्षद पिंपरकर, किरण सावंत, पंढरीनाथ ठोंबरे, विलास जाधव, राघो ठोंबरे, मनोहर ठोंबरे, लहु ठोंबरे, जैतु ठोंबरे, संतोष ठोंबरे, अजय ठोंबरे, भरत ठोंबरे, आदिनाथ ठोंबरे, आदित्य पारधी, पद्माकर ठोंबरे, महेंद्र वारे, गणेश ठोंबरे, सचिन पारधी, दत्ता ठोंबरे, योगेश ठोंबरे, सखाराम जाधव, मंगल ठोंबरे, जिजाबाई वाघ, लताबाई दरोडे, कमाबाई जाधव, ताराबाई ठोंबरे, सुमन जाधव, सुरेखा ठोंबरे, निवीता ठोंबरे, देवकी वारे, सोनी ठोंबरे, सुहा ठोंबरे, नमीबाई ठोंबरे, सगुणा पारधी, जयश्री ठोंबरे, अलका ठोंबरे, तुळशी ठोंबरे,  उर्मिला बांगारे, आशा ठोंबरे, हौसाबाई ठोंबरे, सविता ठोंबरे, तान्हाबाई ठोंबरे या पिंपरकरपाडा, पेठ व हिरेवाडी येथील अनेकांनी शिवसेना पक्षात जाहिर पक्षप्रवेश केला.



 मागील अनेक वर्षापासून पंढरीनाथ पिंपरकर व गौतम मुंढे या आमच्या सहकार्यांचे सामाजिक व राजकीय क्षेत्रातील योगदान समाज हिताच्या दृष्टीने खुप महत्त्वाचे राहिले आहे. त्यामुळे भाजपच्या या दोन दिग्गज नेत्यांनी आपल्या सहकार्यांसह शिवसेना पक्षात जाहिर पक्षप्रवेश करुन अगदी योग्य निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयाचे आम्हा सर्व शिवसेनेकडून जल्लोषात स्वागत होत असून पक्ष संघटना त्याच ताकदीने नव्याने शिवसेना पक्षात सामिल झालेल्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांसाठी उभी असणार आहे

        महेंद्र थोरवे-आमदार

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies